उद्या पासून ग्रामीण भागातील १ ते १२ वर्गाच्या शाळा उघडणार

नागपूर दि. ३१ : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १ ते १२ वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यासंदर्भात आज आदेश काढत उद्या १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्याच्या अनेक भागात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यामध्ये देखील शाळा सुरू करण्याबाबत मागणी आहे. मात्र, गेल्या काही दिवसात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने विविध पातळीवर शाळा व पालक यांचे मनोगत जाणून घेतले आहे.टास्क फोर्स कडूनही बाधित संख्या कमी होईल, असे संकेत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तथापि, शाळा सुरू करतांना सर्व वर्ग स्वच्छ व निर्जंतूककिकरण करण्याविषयी सूचना करण्यात आली आहे. पालकांच्या परवानगीनेच विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घ्यायचे आहे. शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी झाली असणे आवश्यक आहे.कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजना बैठक व्यवस्थेतही करण्याबाबतचे निर्देशित करण्यात आले आहे. याशिवाय परिपाठ, स्नेहसंमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते ते टाळणे बाबतही निर्देशित करण्यात आले आहे. मास्कशिवाय शाळेतील प्रवेश वर्जित करण्यात आला असून प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी दोन डोस आवश्यक करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

स्मार्ट सिटी संदर्भातील शेतकऱ्यांच्या शंका व अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घ्या

Mon Jan 31 , 2022
– शेतकरी व अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्र्यांची संयुक्त बैठक नागपूर दि. ३१ : नागपूर स्मार्ट सिटी अभियानात ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहे. त्यांना या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर विश्वासात घेऊन त्यांच्या शंका दूर करून व त्यांच्या मोबदल्याच्या संदर्भातील अडीअडचणी दूर करून समाधान करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती भवन येथे या अभियानात जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील काही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com