नागपूर :- पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत दिनांक १९/०३/२०२४ रोजीचे १३/३० ते १५/३० वा. पर्यंत आगामी लोकसभा निवडणूक व आगामी सण उत्सव होळी, शिवजयंती संबंधाने भिवापूर शहर व नांद येथे रूटमार्च घेण्यात आला.
रूट मार्च दरम्यान पोलीस स्टेशन भिवापूरचे सपोनी जयप्रकाश निर्मल ठाणेदार यांचे मार्गदर्शनात ०२ अधिकारी, अंमलदार ११, ०६ होम सैनिक, रेल्वे पोलीस फोर्सचे ०१ अधिकारी १९ कर्मचारी असे एकूण ०३ अधिकारी ३० पोलिस अंमलदार व ०६ होम सैनिक रूट मार्च करिता हजर होते.