– अधिकारी, कर्मचा-यांनी घेतला लाभ
अमरावती :- ह्मदयविकार अथवा ह्मदयाघाताने अकाली मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता अशा प्रसंगी तातडीच्या काय उपाययोजना कराव्यात, जेणेकरुन रुग्णाचे प्राण वाचविता येईल, यावर अमरावती शहरातील प्रसिध्द ह्मदयरोग तज्ज्ञ डॉ. राहुल कडू यांनी उद्बोधनच केले नाही, तर प्रत्यक्षरित्या प्रात्याक्षिक करुन दाखविले. त्याचबरोबर या आजाराबाबत असलेल्या शंका-कुशंका, प्रश्नांची उत्तरे देऊन समाधानही केले.संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आरोग्य केंद्राच्यावतीने विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनींकरीता नुकताच विद्यापीठ परिसरातील भौतिकशास्त्र विभागाच्या सभागृहामध्ये या उद्बोधन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्बोधन व प्रशिक्षणवर्ग संपन्न झाला. यावेळी विद्यापीठातील सर्व प्रशासकीय अधिकारी, शैक्षणिक विभागप्रमुख, कर्मचारी यांनी याचा लाभ घेतला.
डॉ. राहुल कडू यांनी सांगितले की, ह्मदयाघात झाला, आणि रुग्ण बेशुध्द झाला, तर अशा वेळी रुग्णाला जमिनीवर झोपवून रुग्णाच्या छातीवर हाताच्या तळव्याने दाब द्यावा, आणि तोपर्यंत रुग्णवाहिका बोलवून रुग्णाला त्वरीत रुग्णालयात हलवावे. मात्र रुग्णवाहिकेत अथवा अन्य वाहनांतून रुग्णाला नेत असतांनाही रुग्णाच्या छातीवर दाब देणे सुरुच ठेवावे. ह्मदयाघाताची कारणे स्पष्ट करतांना डॉ. कडू म्हणाले की, अधिक तणाव, मधूमेह, ब्लड प्रेशर अनियंत्रित झाल्यास ह्मदयाघात होऊ शकतो. सामान्य व्यक्तीला ह्मदयाघात येऊ शकत नाही. ह्मदयविकार असलेल्यांनी अथवा ह्मदयविकार झाल्याची शंका आल्यास इ.सी.जी. तसेच रक्त चाचणी करणे आवश्यक आहे, त्यामुळे संभाव्य धोका टाळता येऊ शकेल. ह्मदयाला रक्तपुरवठा न होणे, मेंदुला रक्त पुरवठा न होणे हे ह्मदयाघाताचे लक्षण आहे. ह्मदयविकार टाळण्यासाठी नियमित व्यायाम करावा, जेवण किमान पंचवीस टक्के कमीच करावे असेही डॉ. कडू यांनी यावेळी सांगितले. धुम्रपानामुळे ह्मदयविकार आणि ह्मदयाघाताची अधिक शक्यता असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे धुम्रपान करू नये, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.
डॉ. राहुल कडू यांनी ह्मदयाघात झालेल्या रुग्णाला कशाप्रकारे सी.पी.आर. देता येईल, याचे प्रात्याक्षिकही करुन दाखविले. एका मशिनव्दारे ह्मदयावर किती दाब द्यावा, कसा द्यावा, छाती किती दबल्या गेली पाहिजे, हे प्रत्यक्ष करून दाखविले. त्याचबरोबर उपस्थित विद्याथ्र्यांकडूनही त्यांनी करवून घेतले. डॉ. कडू यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, विद्याथ्र्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन समाधान केले.
अध्यक्षीय भाषण करतांना कुलसचिव डॉ. तुषार देशमुख म्हणाले, विद्यापीठातील कर्मचारी, विद्याथ्र्यांचे आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आरोग्य विभागातर्फे केलेले आयोजन लाभदायी ठरले आहे. सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि सदैव तंदुरुस्त रहावे, असा मौलीक सल्ला त्यांनी यावेळी दिला. प्रास्ताविकातून आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता थोरात यांनी कार्यक्रमामागील भूमिका विषद केली. संचालन व आभार श्री राजेश पिदडी यांनी मानले. या उद्बोधन व प्रशिक्षणवर्गाला विद्यापीठातील सर्व प्रशासकीय व शैक्षणिक विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठयासंख्येने उपस्थित होते.