कोदामेंढी :- येथील ग्रामपंचायतचे सरपंच आशिष बावनकुळे यांनी पथदीप न खरीदता ग्रामपंचायत मधील सामान्य फंडातून 20/05/2024 ला गावातच निविदा धारक पुरवठा करणारे दुकान असूनही बेकायदेशीरपणे कोदामेंढीवरून वरून 75 किलोमीटर अंतरावर असणारे नागपूर येथील एम .एम. इंटरप्राईजेस या दुकानाचे बोगस बिल जोडून 3,88 ,474 रुपये काढून घोटाळा केला. याबाबत सविस्तर वृत्त मालिका मागील 10 दिवसापूर्वीपासून विविध मराठी व हिंदी दैनिकांमधून प्रकाशित होत आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी गट विकास अधिकारी ते उपमुख्यमंत्री कार्यालय मुंबई ,ठाणेदार ते पोलीस अधीक्षक ग्रामीण नागपूर पर्यंत ऑनलाईन तक्रारी केल्या होत्या. याबाबत शनिवार 19 ऑक्टोबरला मौदा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय झिंगरे यांना भ्रमणध्वनीवरून विचारपूस केली असता ,पथदीप घोटाळ्याचा चौकशी अहवाल कोदामेंढी ग्रामपंचायतचे ग्राम अधिकारी एस .एन .पाटील यांना तपालाद्वारे पत्र देऊन सात दिवसाच्या आत मागविण्यात आला आहे. त्यामुळे पथदीप घोटाळ्याच्या चौकशी अहवाल येत्या शुक्रवारी येणार असून तो चौकशी अहवाल गट विकास अधिकारी संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांच्या मेल आयडीवर पाठविणार आहे . त्यामुळे त्या चौकशी अहवालाकडे गावातील, परिसरातील ,तालुक्यासह जिल्ह्याचेही लक्ष वेधले आहे.