– एस.डी.ओं. सह तहसिलदारांच्या पथकाद्वारे कारवाई
– लाखोंचा महसुल होणार प्राप्त
– क्षमतेपेक्षा ज्यास्त केली रेती लोड
रामटेक :- रात्रीच्या तथा सायंकाळच्या सुमारास आमच्यावर कोण कारवाई करणार असा गैरसमज करीत ट्रक चालक तथा मालकांनी क्षमतेपेक्षा ज्यास्त रेती दस चक्का ट्रक मध्ये लोड करून वाहतुक केली असता त्यावर एस.डी.ओ. वंदना सवरंगपते तथा तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या पथकाने तपासणी करीत कारवाई केली. सध्या सर्व ट्रक तहसिल कार्यालयात जमा आहेत.
एस.डी.ओ. वंदना सवरंगपते यांनी दिलेल्या माहितीनुसार एस.डी.ओ. यांच्या पथकाने ३ तर तहसिलदार यांच्या पथकाने २ ओव्हरलोड रेतीच्या ट्रकवर ही कारवाई केलेली आहे. तसेच पोलीस स्टेशन रामटेकद्वारे एका ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेले ट्रक हे बाहेरील असुन क्षमतेपेक्षा ज्यास्त माल भरून त्याची वाहतुक केल्याप्रकरणी ट्रक मालकांवर लाखोंचा भुर्दंद व महसुल विभागाला लाखोंचा महसुल प्राप्त होणार असल्याचेही यावेळी सवरंगपते यांनी सांगितले. कारवाई करण्यात आलेल्या ट्रकमध्ये एम.एच. ४० ए. के. ७७०१, एम.एच. ३१ एफ. सी. ३५०४, एम.एच. ४० सी. एम. ०८१४, एम.एच. ४० सी. डी. ९५८८, एम.एच. ४० बी. एल. ८८०१ यांचेसह पोलीस प्रशाषणाने कारवाई केलेल्या एका ट्रकचा समावेश आहे. क्षमतेपेक्षा ज्यास्त रेती लोड करून तुमसर – रामटेक – भंडारा मार्गावर हे वाहतुक करतांना आढळुन आले.
तिन पथके तयार करण्यात आली आहे – सवरंगपते
एस.डी.ओ. वंदना सवरंगपते यांना ‘ महसुल विभागातर्फे अशा प्रकारच्या कारवाया नियमीत का करण्यात येत नाही ? ‘ असा प्रश्न केला असता त्यांनी सांगीतले की, मध्यंतरी आमच्या पथकांनी अशा प्रकारांकडे दुर्लक्ष केले मात्र यापुढे मी असे चालु देणार नाही. आता मी तिन पथके तयार केलेली आहे. त्यामध्ये एस.डी.ओ. चे एक, तहसिलदारांचे एक तथा नायब तहसिलदारांचे एक अशा ३ पथकांचा समावेश आहे. या तिनही पथकांना रात्रीच्या सुमारास तपासनीसाठी तथा कारवाईसाठी सज्ज करण्यात आलेले आहे असेही एस.डी.ओ. वंदना सवरंगपते यांनी माहिती देतांना सांगीतले.