सिमेंट क्रॉक्रीट रस्त्याच्या कामासाठी वाहतूकीस प्रतिबंध

नागपूर :-  सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाकरीता शहर प्रकल्प टप्पा 3 मधील रस्ता क्र. 3 आझाद चौक ते लाकडीपूल व रस्ता क्र.5 मनिपुरा चौक ते लाकडीपूल, आयचित मंदिर हा रस्ता वाहतूकीसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे .

हा आदेश 14 नोव्हेंबर 2023 पर्यंत अंमलात राहील. महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 236 (1) अन्वये आझाद चौक ते लाकडीपूल व रस्ता क्र. 5 मनिपुरा चौक ते लाकडीपुल, आयचित मंदिर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून सदर वाहतुकी आयचित मंदिर ते झेंडा चौक आणि झेंडा चौक ते गंगाबाई घाट कडे वळविण्यात आली आहे, असे आदेश नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी दिले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपा महाजनसंपर्क अभियानात राज्यात ४८ सभा होणार

Thu Jun 1 , 2023
अभियान संयोजक आ. प्रवीण दरेकर, मुंबई अध्यक्ष आ.आशीष शेलार यांची माहिती मुंबई :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे देशभरात ३१ मे पासून महिनाभर महाजनसंपर्क अभियानाला सुरुवात झाली असून या द्वारे ८० कोटी नागरिकांपर्यंत मोदी सरकारची विकास कामे व कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचवली जाणार आहे. राज्यात या अभियानानिमित्त ४८ जाहीर सभा होणार असल्याची माहिती महाजनसंपर्क अभियानाचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com