शनिवारी मनपा मुख्यालय व झोन कार्यालयातील मालमत्ता कर संकलन केंद्र सुरू राहणार

नागपूर  : नागपूर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी वर्षाच्या शेवटच्या दिवशी अर्थात शनिवारी ३१ डिसेंबर २०२२ रोजी मनपा मुख्यालयासह सर्व झोनमधील कर संकलन केंद्र सुरू राहणार आहेत. कर संकलनाच्या दृष्टीने मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांनी निर्णयाचे परिपत्रक जारी केले आहे.

सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात मालमत्ता कर धारकांना कराचा भरणा करणे सोईचे व्हावे यासाठी शनिवारी ३१ डिसेंबर रोजी दहाही झोन कार्यालय आणि मनपा मुख्यालय सिव्हिल लाईन्स येथील कर संकलन केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी या व्यवस्थेचा लाभ घेउन मालमत्ता कर भरावा, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

 

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com