संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी:- कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या व कामठी शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागात शहरासह बदलत्या वातावरणामुळे सर्दी,ताप ,खोकल्यासारखे आजार उफाळून येत असतानाच येरखेडा व रणाळा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या नागरिकांची कानाकोपऱ्यात घोंगावणाऱ्या डासांनी झोप उडविली आहे यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने नियमित धूर आणि औषध फवारणी करावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
साचलेले पाणी,जागोजागी दिवसभर साठलेला कचरा ,सांडपाण्याने वाहणारे नाल्या यामुळे डासांची पैदास होण्यास पोषक वातावरण निर्माण होत आहे यामुळे गावात धूर फवारणी व औषध फवारणी करणे गरजेचे असले तरी याकडे दुर्लक्ष केले जात आहे.उघड्या खिडक्या ,दारातून हे डास घरात येत असल्यामुळे नागरीकानी ग्रा प प्रशासन विरोधात नाराजगी व्यक्त केले आहे.प्रभागातील कचरा नियमित उचलण्यासह आणि कचरा साचलेल्या ठिकाणी नियमित फवारणी केल्यास डासांच्या अळ्या नष्ट होऊ शकतील मात्र ग्रा प प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे तसेच परिसरात उघड्यावर मोकळ्या जागेत साचलेले डबके हे डासांचे माहेरघर झाल्याने या डासांच्या उच्छादने नागरिक हैराण झाले आहेत.