फसवणुक करणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर :- फिर्यादी राजु शिवचरण श्रीवास, वय ५२ वर्ष, रा. फ्लॅट नं. १०८४, विनोबा भावे नगर, यशोधरानगर, नागपूर यांच्या पत्नीचे दोन वर्षा पूर्वी आजाराने निधन झाल्याने फिर्यादी यांनी दुसऱ्या लग्नाकरीता शादी डॉट कॉम या संकेत स्थळावर आपली नोंदनी केली. आरोपी क. १) मयुरी प्रमोद काळे उर्फ गरीमा शिद वय २७ वर्ष रा. हुडेकश्वर नाका जवळ, नागपूर ही पूर्वी शादी डॉट कॉम मध्ये नोकरी करीत असतांना वर्तमान पत्रामध्ये वर वधू पाहिजे यांचे नावाखाली आपला संपर्क नंवर स्वतःचा मोबाईल नंबर दिला होता, फिर्यादी यांनी आरोपी क. १ यांचे सोबत संपर्क केला असता, आरोपी क. १ यांनी फिर्यादीकडून नोंदणी फी म्हणून ५,०००/- रू मागीतले. त्यानंतर दिनांक ०१.०४.२०२२ ते ००,०० वा, ते दि. २९.१२.२०२३ चे १६.०० वा. चे दरम्यान, आरोपी क. १ यांनी फिर्यादी कडुन वेगवेगळया कारणासाठी गुगलपे, फोनपेच्या माध्यमातुन ९ ते १० लाख रूपये फिर्यादी कडून घेतले. परंतु आरोपी क. १ यांनी फिर्यादीस लग्नाकरीता वधु उपलब्ध करून दिली नाही. आरोपी क. १ यांनी आरोपी क. २) सचिन लक्ष्मीकांत संगीतराय वय ३२ वर्ष रा. अंबाळा वार्ड रामटेक, जि. नागपूर यांचे मदतीने फिर्यादीची समाजात बदनामी करेल अशी धमकी देवुन फिर्यादी कडून १,००,०००/- रु ची खंडणी मागीतली, याकारणामुळे फिर्यादीने किटकनाशक प्राशन केले होते. याबाबत फिर्यादीचे मुलाने आरोपी क. १ यांना सांगीतले असता, आरोपी क. १ हिने आरोपी क. २ यास फिर्यादीचे मुलाकडे पाठवुन प्रकरण मिटवुन टाका नाही तर जिवे ठार मारेल अशी धमकी दिली. फिर्यादीचे असे रिपोर्टवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे कलम ४०६, ४२०, ३८७, ५०६ (ब), ३४ भा.दं. वी अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी क. १ व २ यांना अटक केली आहे. पुढील तपास सपोनि नरेन्द्र तावडे हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चोरी करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Thu Feb 29 , 2024
नागपूर :- फिर्यादी डेलसिंग नारायणसिंग बंजारी वय २७ वर्ष रा. हिरणी मुकासा, ता. अमरवाडा, जि, छिंदवाडा यांनी लाखांदूर येथुन १५ टन वटाणे त्यांचे ट्रक क्र. सि.जी ०४ एम.एल. ७२४१ मध्ये लोड करून नागपूर येथे पोलीस ठाणे पारडी हद्दीत उमिया वसाहत गेट समोर, ट्रक ऊभा करून बाजूला गेला असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीना ट्रक मुद्देमालासह किमती अंदाजे १८,१३,२००/- रू चा मुद्देमाल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights