रा. स्व. संघ : अखिल भारतीय प्रतिनिधी सभा 15, 16, 17 मार्चला नागपुरात 

नागपूर :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यावर्षी 15, 16 आणि 17 मार्च 2024 रोजी विदर्भातील नागपूर (महाराष्ट्र) येथील ‘स्मृतिभवन’ परिसर , रेशिमबाग येथे होणार आहे. बैठकीत 2023-24 च्या संघाच्या कार्याचा आढावा आणि आगामी वर्षाच्या (2024-25) संघाच्या कार्य आराखड्यावर चर्चा होणार आहे . यासोबतच  सरसंघचालकांसह अन्य सर्व अखिल भारतीय कार्यकर्त्यांचा प्रवास , स्वयंसेवक प्रशिक्षणासाठी संघ शिक्षा वर्गांच्या नव्या योजनेच्या कार्यान्वयनाबाबत विचार होईल. संघाच्या शताब्दीनिमित्त कार्य विस्तार योजनेच्या बळकटीकरणासोबतच विशेषतः आगामी शताब्दी वर्षाच्या उपक्रमांवर चर्चा होईल . प्रतिनिधी सभेत देशाच्या सद्यस्थितीचा विचार करून , महत्त्वाच्या विषयांवरही प्रस्तावही पारित केले जातील.

संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा दरवर्षी देशाच्या विविध भागात आयोजित केली जाते. दर तिसऱ्या वर्षी तिचे आयोजन नागपुरात केले जाते . प्रतिनिधी सभेत 45 प्रांतातील 1500 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. प्रतिनिधी सभेच्या बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत,  सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले, सर्व सह सरकार्यवाह, अखिल भारतीय कार्यकारिणी , क्षेत्र आणि प्रांत कार्यकारिणी, संघाचे निवडून आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी, सर्व विभाग प्रचारक तसेच विविध संघटनांचे निमंत्रित कार्यकर्ते सहभागी होतील .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आदिवासी धर्मांतरणाचा मुद्दा पुन्हा विधीमंडळात गाजला, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधिमंडळात मांडला अहवाल

Sat Mar 2 , 2024
– आयटीमध्ये अल्पसंख्यांक आणि अनुसूचित जाती अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणाऱ्या २५७ विद्यार्थ्यांची आढळली नोंद! मुंबई :- महाराष्ट्रातील आयटीआय संस्थांमध्ये अल्पसंख्यांक आणि अनुसूचित जाती अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणारी आणि आदिवासी समाजातून धर्मांतरण करून अल्पसंख्यांक आणि आदिवासी अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणारे विद्यार्थी असल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सखोल चौकशी करण्याचे निर्देश नागपूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com