रस्त्यावरील लोकांच्या जीवांचे रक्षण करण्यासाठी संपूर्ण भारतातील राष्ट्रीय राज्य महामार्गावर दुचाकी वाहनांसाठी सर्विस रस्त्यांचा विस्तार करणे व सर्विस लेन तयार करण्यासाठी गडकरींना निवेदन

– दुचाकी वाहनांसाठी सर्विस रस्त्यांचा विस्तार करून विशेष लेन तयार केल्या पाहिजेत. सामाजिक कार्यकर्ते इबादुल सिद्दीकींचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री गडकरीकडे मागणी

नागपूर :- सामाजिक कार्यकर्ते इबादुल सिद्दीकी उर्फ जनहितशी यांनी नागपुरात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून देशभरात होणाऱ्या अपघातात लाखो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी राष्ट्रीय व राज्य महामार्गावर दुचाकी वाहनांसाठी सर्विस रस्ते वाढविण्याची मागणी केली. विशिष्ट लेन तयार करण्यासाठी सिद्दीकी यांनी गडकरींना नम्र विनंती केली की, भारतभर रस्ते वाहतुकीमध्ये चारचाकी वाहने आणि मोठे ट्रक, लॉरी आणि मोठे मोठे ट्रक चालत असल्याने दुचाकी वाहनांच्या अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे कुटुंबासह प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांसह संपूर्ण कुटुंबच अपघाताचे बळी पडतात. दरवर्षी अपघातात दीड लाखांहून अधिक मृत्यू होत असून पाच लाखाहुन अधीक मोठे अपघात होतात. दहा लाखाहुन अधीक लहान दुर्घटना होते. यामध्ये 19 ते 35 वयोगटातील नवयुवक युवतींचा 65 टक्के दुचाकी स्वारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अशा अपघातांना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या सर्विस रस्त्यांचे विस्तारीकरण करणे आणि रस्त्यालगत दुचाकी वाहनांसाठी खास लेन स्वतंत्र लेन तयार करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना स्वतंत्रपणे वाहन चालवितांना फायदा होणार आहे. तसेच महामार्गावर अपघात होण्याची शक्यता कमी आहे. लाखो लोकांचे प्राण वाचविणे महत्त्वाचे आहे. सिद्दीकी यांनी गडकरींना सांगितले की, त्यांच्या नेतृत्वाखाली देशात महामार्गांचा उल्लेखनीय विकास झाला आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरून प्रवास करणे आणखी सोपे झाले आहे. आता चांगल्या रस्त्यांमुळे वाहन कमी वेळेत इच्छित स्थळी पोहोचते. महामार्गाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी रस्ता दुभाजकावर रोपे लावल्यास वाहन चालकांना फायदा होणार असल्याने वाहनांना दुसऱ्या टोकाकडून पडणाऱ्या प्रकाशाचा सामना करावा लागणार नाही. सार्वजनिक हितासाठी, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील विशेष लेन दुचाकी चालकांसाठी उपयुक्त ठरतील आणि लाखो लोकांचे प्राण वाचतील. केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी या सूचनेची दखल घेऊन येणाऱ्या काळात त्याचा गांभीर्याने विचार केला जाईल. असे आश्वासन दिले. नागपुरात नितिन गडकरींची प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन विनंती केली होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

FELICITATION CEREMONY HONORS NCC CADETS AT HQ MC,AF NAGPUR 

Fri Mar 21 , 2025
NAGPUR :- The NCC Group Headquarters organized an esteemed felicitation program at the Headquarters Maintenance Command, IAF, to honour the outstanding cadets who excelled in national camps such as the All India Thal Sainik Camp (AITSC), All India Nau Sainik Camp (AINSC), All India Vayu Sainik Camp (AIVSC), Republic Day Camp (RDC), and Army Day Parade (ADP). The event also […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!