कुंभारे कॉलोनीत पोलिसांची गस्त प्रभावीपणे राबवा :- जनसेवक उदास बन्सोड

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 26 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 16 येथील कुंभारे कॉलोनी मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेदिवस वाढीवर असून कुंभारे कॉलोनी परिसरात चोरी व घरफोडीचे प्रमाण दिवसेदिवस वाढीवर आहेत त्यामुळे येथील नागरिक गण स्वतःला असुरक्षित मानत असून परिसरात चोरट्यांचा हैदोस पसरला आहे.या परिसरात जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, तसेच विपश्यना सेंटर तसेच महाविद्यालये आहेत आगामी काळात धार्मिक पर्वाना सुरुवात होणार असून विजयादशमी, तसेच ड्रॅगन पॅलेस च्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या कोन्याकोपऱ्यातून अनुयायी येणार आहेत .तेव्हा नागरी सुरक्षात्मक दृष्टिकोनातून प्रभाग क्र 16 परिसरात पोलिसांची रात्र गस्त प्रभावीपणे राबवावे अशी मागणी येथील जनसेवक उदास बन्सोड यांनी पोलीस विभागाला केली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com