जाम नदी प्रकल्पातुन जाणारा कालव्याला ठीक ठिकाणी लिकेज दुरूस्ती करा

– जाम मध्यम प्रकल्पाचे कालवा व उप कालवे

– कालवा लिकेज मुक्त होणार!

– दुरुस्ती करिता शासन निधीची साठी मंजुरी मिळवून देऊ – आमदार चरणसिंग ठाकूर

कोंढाळी/ काटोल :- काटोल नरखेड दोन्ही तालुक्याला रब्बी हंगामात सिंचनाकरिता पाणी पुरवठा करणारा कालवा गेल्या अनेक वर्षपासून नादुरुस्त असल्याने जागोजागी फुटला होता सोबतच या कळव्यात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढल्याने कालव्यातून वाहून जाणाऱ्या पाण्याचा मोठया प्रमाणात अपव्यय होतो अश्यात या कालव्याची दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबविण्याची मागणी जोर धरू लागली होती नवयुक्त आमदार यांनी यात लक्ष घालून यात दुरुस्ती करून घेण्याची मागणी आहे. या मागणीची पुर्णता करण्याचे दृष्टीने या भागातील आमदार चरणसिंग यांनी सिंचन विभागाचे वरिष्ठ अधिकार्यांसोबत चक्क जाम मध्यम प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे जागोजागी २८कि.मी.घटनास्ळ जाऊन निरिक्षण केले या प्रसंगी कृषी मित्र दिनेश ठाकरे सोबत होते.

निसर्गाचा लहरीपणा यामुळे  शेतकऱ्यांना जेरीस आणले आहे दर वर्षी खरिपाचे मोठे प्रमाणात नुकसान होते यातून उभारी घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या आशा रब्बीवर टिकून असता यासाठी शेतकऱ्यांना कालव्यातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याची प्रतीक्षा असते . काटोल तालुक्यातील रिधोरा येथे असलेल्या जाम नदी प्रकल्प कालवा हा काटोल व नरखेड या दोन्ही  तालुक्‍यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पाणी पुरवठा करतो यामुळे हजारो शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न निकाली लागतो.

काटोल नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यानां पाणी पुरवठा करणारा हा कालवा तालुक्याकरिता जलवाहिनी म्हणुन ओळखला जातो.रोधोरा येथून जाम प्रकल्पातून निघणारा हा कालवा काटोल पारडसिंगा मार्गे पुढे नरखेड तालुक्यात वडवीरा गावापर्यंत काटोल एकूण 28 किमी असलेला हा कालवा एकूण दोन्ही तालुक्यातील असंख्य गावातील हजारो शेतकऱ्यांना सिंचन पुरवठा करतो. प्रकल्पाच्या कालव्याच्या लाभ क्षेत्रात येणारी शेतजमीन ही हलकी असल्यामुळे पाण्याची गरज असते. हरभरा व गव्हाची पेरणी करायची असले तरीही पाणी आवश्‍यक आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या वतीने दरवर्षी कालव्यातून शेवटच्या गावापर्यंत शेतकऱ्यांना शिंचनाला पाणी उपलब्ध होईल अश्या बतावण्याकेल्याजातात मात्र कालवा जार 70 टक्के जागोजागी फुटला असलेतर सिंचनाचा उद्देश पूर्ण होतो तरी कसा हा प्रश्न शेतकरी दरवर्ष उपस्थिती करतात मात्र याकडे कोणी लक्ष देत नाही कालव्यातून पाणीच येत नसेल तर पेरणी करावी तरी कशी असा सवाल केला जात आहे.

याप्रसंगी कृषी मित्र दिनेश, किशोर गाढवे तसेच अनेक पदाधिकारी व सिंचन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आजवर झाले ते झाले मात्र या नंतर हा सिंचनाचा प्रश्नच निर्माण होणार नाही याकरिता शनिवार ला प्रकल्प अधिकारी यांचेस कालव्याचें निरीक्षण करण्यात आले निरीक्षणात कालव्याची स्थिती अतिशय वाईट दिसुन आली तात्काळ कालवा दुरुस्ती करिता प्रस्तावा तयार करण्यास अधिकार्यांना सूचना केलेल्या असुन लवकरात लवकर दुरुस्ती करिता निधी उपलब्ध करून देण्याकरिता स्वतः पाठवपुरावां करून हा कालवा अतिशय स्वच्छ आणि लीकेज मुक्त केल्या करण्यात येणार आहे.

– आमदार चरणसिंग ठाकुर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नागपूर-चंद्रपूर-गोंदिया संघाची चमकदार कामगिरी

Mon Feb 10 , 2025
नागपूर :- महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेत नागपूर-चंद्रपूर-गोंदिया संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करत अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले. धावण्याच्या शर्यतीत 5, कॅरममध्ये 3 अजिंक्यपदांसह ब्रिज, बुद्धिबळ आणि भारोत्तोलनमध्येही या संघाने बाजी मारली. या स्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाने सर्वसाधारण अजिंक्यपद, तर पुणे-बारामती संघाने उपविजेतेपद मिळवले. बारामती येथील विद्यानगरीच्या क्रीडा संकुलामध्ये महावितरणच्या चार दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप शनिवारी (दि. 8) झाला. विजेता व उपविजेत्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!