आठ दिवसात हँड पंप दुरुस्त करा, अन्यथा आंदोलन

संदीप कांबळे,कामठी
माजी नगरसेविका संध्या रायबोले यांचा न प प्रशासनाला इशारा
कामठी तालुका प्रतिनिधी २9 एप्रिल- नवीन कामठी भागातील प्रभाग 15 मधील आनंदनगर, रामगढ, समतानगर, सैलाबनगर, रमानगर भागातील जवळपास सहा हँडपंप मागील महिनाभरापासून नादुरुस्त अवस्थेत असून नगर परिषद प्रशासनाला वारंवार लेखी तक्रार आणि सूचना करून देखील हॅन्ड पंप दुरुस्ती करण्यात आली नाही.
त्यामुळे येत्या आठ दिवसात हँड पंप दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा नगर परिषद प्रशासन विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी निवेदनाद्वारे नगर परिषद प्रशासक श्याम मदनकर यांना आज दिला उन्हाळा मोठ्या प्रमाणात तापत असून लोडशेडिंगमुळे नळांचे पाणी पुरवठा करण्याचे वेळापत्रक बिघडले आहे.
पाणी पुरवठा नियमित होत नसल्याने पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम समाजबांधवांना सहरी आणि रोजा अफतारी दरम्यान मनस्ताप होतो त्यामुळे हँडपंप हा एकमेव पर्याय नागरिकांसमोर आहे करिता नागरिकांच्या सुविधासाठी हॅन्ड पंप तातडीने दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी नगरसेविका संध्या रायबोले यांनी नगर परिषद कामठी चे प्रशासन श्याम मनुरकर यांना आज निवेदनाद्वारे केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी तालुक्यात शेती मशागतीला आला वेग

Fri Apr 29 , 2022
संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 29:- कामठी तालुक्यात उन्हाचा प्रकोप असला तरी कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यास दूर ठेवत रखरखत्या उन्हात शेती कामे करण्यास सुरुवात केली आहे.अवघ्या महिनाभरात पेरणी करावी लागणार असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात शेती मशागतीला वेग आल्याचे दिसत आहे. मागील काही वर्षापसून सतत दुष्काळ , वादळी वाऱ्यासह गारपीट याप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील शेतकरी राजा होरपळून गेला होता , मधातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!