मतदार जागृतीसंबंधी पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते 11 सप्टेंबर रोजी प्रकाशन

मुंबई :- मतदार जागृतीचा उपक्रम म्हणून ‘आगम’ या सामाजिक संस्थेने किशोर आणि युवा पिढीला भारतातील निवडणूक यंत्रणा, मतदानाचे महत्त्व याची माहिती देण्यासाठी ‘मी सुपरहिरो भारताचा नागरिक! (Me The Superhero Indian Citizen!)’ हे पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन दि.11 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.00 वा. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे होणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम आयोजित करत असते. त्यासाठी विविध सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, खाजगी व शासकीय आस्थापने यांचे सहकार्य घेतले जाते. मतदार जागृतीचे हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असून त्यांतील भाषा तरुण पिढीला सहज समजणारी आहे. हे एक ‘कॉमिक बुक’ असून साध्या सोप्या उदाहरणांतून निवडणूक यंत्रणा, मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व, निवडणूक प्रक्रिया, सुजाण नागरिकाच्या जबाबदाऱ्या इ. समजावून सांगण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालये, विद्यार्थी आणि पालक यांनी हे आवर्जून वाचावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी, आगम संस्थेच्या सहसंचालक भारती दासगुप्ता आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमांसाठी चार हजार कोटींच्या रोख्यांची विक्री

Sat Sep 9 , 2023
मुंबई :- राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमांसंबधित खर्चासाठी 10 वर्षे मुदतीच्या तसेच 11 वर्षे मुदतीच्या प्रत्येकी दोन हजार कोटींच्या रोख्यांच्या विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विविध विकासकामांना अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे. या कर्ज उभारणीस केंद्र सरकारची मान्यता घेण्यात आली असून ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com