तिरंगा जनजागृती अभियान पोस्टरचे विमोचन, राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी नागपुरात जनजागृती अभियान

नागपूर :- राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. मुले व युवकांनी, तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी आणि समस्त नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा, असे आवाहन सेन्साई संजय इंगोले (कराटे NSKA-मुख्य प्रशिक्षक) यांनी आज केले.

राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सम्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान “नाग स्वराज फाऊंडेशन” द्वारा आयोजित आणि कामयाब फाऊंडेशन व हर दिन होंगे कामयाब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करा सम्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान पोस्टरचे विमोचन सेन्साई संजय इंगोले (कराटे (NSKA) इंडियाचे मुख्य प्रशिक्षक व तकनीकी निदेशक) यांच्या हस्ते आज करण्यात आले.

नाग स्वराज फाऊंडेशन या सामाजिक संस्थेद्वारा गेल्या वर्षा 2010 पासून राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सम्मान तिरंग्याचा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियांनाद्वारे कागदी व प्लॉस्टिकचे ध्वज(तिरंगा) उचलण्याचे कार्य ही संस्था करीत आहे. नागपूर शहरातील उद्याने, शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणावरील पडलेले, फाटलेले, कुजलेले कागदी व प्लॉस्टिकचे ध्वज(तिरंगा) उचलते. 26 जानेवारी व 15 ऑगष्ट या दिवशी लहान मुले, युवक-युवती मोठ्या उत्साहाने राष्ट्रीय ध्वज‘तिरंगा’ घेवून फिरतात व ध्वज(तिरंगा) फाटलाकी कुठेही फेकून देतात यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. असे होवू नये म्हणून नाग स्वराज फाऊंडेशनचे कार्यकर्ते राष्ट्रीय ध्वज उचलून सांभाळण्याचे कार्य करीत आहेत. हा उपक्रम चांगला असल्याचेही सेन्साई संजय इंगोले यावेळी म्हणाले.

23 ते 27 जानेवारी 2023 या कालावधीत जनजागृती अभियान सुरु होत आहे. या अभियानाच्या दरम्यान पथनाटय, शाळा, महाविदयालयामध्ये स्टीकर, पोस्टर वितरण करुन तिरंगाची माहिती व नियमाची माहिती देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला यावेळी नाग स्वराज फाउंडेशनचे सचिव हितेश डोर्लीकर सोबत सेन्साई प्रणय भोंगे, सेन्साई मोहीत पंडिया, सेन्साई देवेश कटारे,सेन्साई पराग मुळे,सेन्साई अविनाश इंगोले, हेमंत पराते, हर्षा डोर्लीकर, यज्ञेश कपले, अनिल पाटील, राहुल माटे, मनिष बोराटकर, रोशनी चव्हाण, प्रियंका पानतावणे व इतर युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

● राष्ट्रध्वजाचा अवमान टाळा !

●प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरू नका !

●पताका म्हणून राष्ट्रध्वज वापरू नका !

●तिरंग्याच्या रंगाचे पतंग उडवू नका !

●राष्ट्रध्वज छापलेले कपडे घालू नका !

●तिरंग्याच्या प्रतिकृतीचे केक कापू नका !

●राष्ट्रीय अस्मितेच्या रक्षणार्थ या कार्यात सहभागी व्हावे..!!

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राम गणेश गडकरी अमर रहे च्या जयघोषानी दुमदुमली नगरी

Mon Jan 23 , 2023
थोर साहित्यिक, नाटककार, लेखक कै.राम गणेश गडकरी यांच्या १०४ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीला स्मरण करुण विविध संघटना मार्फत भावपुर्वक श्रध्दांजली वाहण्यात आली सावनेर :- थोर नाटककार,साहित्यिक कै.राम गणेश गडकरी यांच्या 104 व्या पुण्यतिथी निमित्ताने गणेश वाचनालय, गडकरी युवा मंच, गडकरी स्मृती निलयम, राम गणेश गडकरी कला वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय,व्यापारी संघ, आकार रंगभूमी,सावनेर तालुका मराठी पत्रकार संघ,सामाजिक संस्था तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!