नागपुर :- ‘खेल खिलाडी खेल’ च्या दीपावली अंकाचे प्रकाशन केन्द्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हॉटेल रेडिसन जवळील निवासस्थानी उत्साहात झाले. याप्रसंगी अतिथी म्हणून आयकर विभागातील सेवानिवत्त अधिकारी व्हॉलिबॉलपटू अभय चोरघडे, आरसीएफचे अधिकारी व शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी प्रकाश पाठक, चंद्रपूर एमआयडीसीचे माजी अध्यक्ष व बाबासाहेब पुरंदरे यांचे शिष्य अशोकसिंह ठाकूर, आयडीसीपीईचे माजी प्राचार्य डॉ. अनिलकुमार करवंदे उपस्थित होते.
‘खेल खिलाडी खेल’ चे संपादक संजय लोखंडे यांनी अतिथींचे स्वागत केले. याप्रसंगी ना. नितीन गडकरी यांनी नीरज चोपडा याचे कव्हर पाहून दिवाळी अंकाची विशेष प्रशंसा केली.