‘दिल्लीची बुलबुल’ सचित्र कथासंग्रहाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई :- विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांचे चारित्र्य आणि दृष्ट‍िकोन उत्तम राहण्यासाठी चांगले वाचन गरजेचे असून कथासंग्रह यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ‘दिल्लीची बुलबुल’ या सचित्र कथासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी केले.

उत्तरप्रदेश सरकारच्या निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव तसेच नॅशनल बुक ट्रस्ट, भारत सरकारच्या विश्वस्त डॉ. अनिता भटनागर जैन लिखित ‘दिल्लीची बुलबुल’ या सचित्र कथासंग्रहाचा मराठी अनुवाद करण्यात आला आहे. त्याचे प्रकाशन मंत्री केसरकर यांच्या हस्ते आज त्यांच्या रामटेक या शासकीय निवासस्थानी झाले. यावेळी निवृत्त महसूल सेवा अधिकारी आशू जैन, बंदरे, परिवहन आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, विद्या प्रकाशन मंदिरचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ जैन आदी उपस्थित होते.

मंत्री केसरकर म्हणाले की, पर्यावरण आणि नैतिकता हे विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडविण्यात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्ट‍िकोन उत्तम राखण्यात महत्वाचे घटक आहेत. भाषा समृद्ध होण्यासाठी आणि सांस्कृतिक विविधता जपण्यासाठी देखील प्रादेशिक भाषेतील कथासंग्रह उपयुक्त ठरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ.जैन यांनी हिंदी आणि इंग्रजीमध्ये विविध विषयांवरील 60 पेक्षा अधिक साहित्य लेखन केले असून त्यांची पर्यावरण, नैतिकता आणि संस्कृती या विषयांवर भर देणारी विद्यार्थ्यांसाठी लिहिलेली पुस्तके सुमारे 15 भाषांमध्ये उपलब्ध आहेत. त्यांना त्यांच्या पुस्तकांसाठी विविध पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मराठवाड्यातील इनाम जमिनीसंदर्भातील अहवाल तत्काळ सादर करावा - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

Thu Sep 14 , 2023
मुंबई :- विभागीय आयुक्तांनी मराठवाडा विभागाचा परिपूर्ण अभ्यास करुन इनाम जमिनीसंदर्भातील वस्तुनिष्ठ अहवाल शासनास तातडीने सादर करावा असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. हैदराबाद रोख इनामे रद्द करणे अधिनियम 1954 चे कलम 2 अ मध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील बैठक आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार सुरेश धस, महसूल विभागाचे अपर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com