नागपूर :- आगामी लोकसभा निवडणुक – २०२४ संबंधाने पोलीस आयुक्त, नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त,नागपूर शहर व अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग यांचे सुचनांनुसार पोलीस ठाणे पारडी हद्दीत दिनांक ११/०३/२०२४ रोजी सकाळी १०:०० वा. ते १२.१५ वा. चे दरम्यान लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन २०२४ चै पूर्व तयारी ने अनुषंगाने निकेतन कदम, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ के. ५, नागपूर शहर यांने मार्गदर्शनात वपोनि रणजीत शिरसाठ, पो. ठाणे पारडी, नागपूर शहर व अन्य ०३ अधिकारी व २५ पोलीस अंमलदार व ५० बी.एस.एफ. चे जवान यांचे उपस्थीतीत पारडी हददीतील पारडी हनुमान मंदीर चौक ते उपरे मोहल्ला, अण्णाभाऊ साठे मैदान, गोंडपुरा, गजानन मंदीर, भांडवाडी रोड, गिरीजा नगर, शिवनगर, अंबेनगर, चिंचेचे झाड, चांदणो चौक, विनोबा भावे नगर, पारडी पोलीस चौकी, खाटीकपुरा, तेलीपुरा या दरम्यान रुट मार्च काढण्यात आला. रुट मार्च दरम्यान पो. ठाणे परीसरात फिरून मतदारांना/नागरीकांना भयमुक्त व शांततापूर्ण वातावरणात लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यास सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
मतदान करणे हा नागरीकांना हक्क व अधिकार आहे याबाबत जनजागृती करून देण्यात आली. त्यांनी कोणत्याही आमिषाला किवा प्रलोभनाला बळी पडू नये, त्याच बरोबर गुंड प्रवृत्तीचे लोक किंवा समाजकंटक यांचे कडुन याकरीता काही त्रास उद्भवल्यास पोलीस ठाणेस गुप्त पध्दतीने, प्रत्यश्च किंवा डायल कमांक ११२ ला तात्काळ माहिती पुरविणे बावत्त सुचना व मार्गदर्शन करण्यात आले, घेण्यात आलेल्या रुट मार्च मुळे व लोकात केलेल्या जनजागृती मुळे नागरीक प्रभावित होवुन त्यांचे मध्ये कुतुहल व सकारात्मकतेची भावना प्रामुख्याने दिसुन आली.
सदर रुट मार्च हा निकेतन कदम पोलीस उप आयुक्त, परिमंडळ क. ०५ यांचे उपस्थीतीत्त, सत्यपालसिंग असीस्टंट कमांडंट बि.एस.एफ यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे पारडी येथील अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.