अरोली :- सोयाबीनने यंदा शेतकरी व खाद्य तेलाचे ग्राहक अशा दोघांच्याही डोळ्यात पाणी आणले आहे. शासकीय खरेदीत अटींचा भरमार व खुल्या बाजारात पडते दर यामुळे शेतकरी त्रस्त असतांना सोयाबीन तेल वापरणाऱ्या ग्राहकांना तेलाच्या वाढीव दराचा सामना करावा लागत आहे. तेलासह इतरही जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात ठेवून महागाई कमी करून सर्व सामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी खात येतील काँग्रेसच्या प्रमुख महिला कार्यकर्ता गीता भगत, यांनी नागपूर अधिवेशनात आलेल्या संबंधित मंत्र्याकडे केली आहे.