दुकानासमोर दुचाकी ठेवल्याचा वाद शिगेला..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 14 : स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोंढा रोड वरील मार्गावरील एका घडी दुकानाला लागून असलेल्या शेजारी रहिवासी तरुणाने गाडी ठेवल्यावरून झालेला शाब्दिक वाद हा विकोपाला जाऊन पोहोचल्याने काही वेळ दोन गटात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.यासंदर्भात दोन्ही गटाविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला.यात गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची संख्या 11 आहे तर ही घटना आज सकाळी 11 दरम्यान घडली.

यासंदर्भात फिर्यादी शकुंतला शर्मा ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सुलेमान अब्बास वय 55 वर्षे, शब्बीर हसन वय 45 वर्षे,मोहफिज हैदर वय 35 वर्षे तिन्ही राहणार मोंढा रोड कामठी विरुद्ध भादवी कलम 324,294,506(2),504 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर जख्मि फिर्यादी सुलेमान अब्बास चिराग अली वय 57 वर्षे ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी लखन शर्मा,दीपक लिंबानीया,अमित्त उके,हिमांशू कनोजे,प्रियांशु कनोजे,सागर लिंबानीया,अंकुर पांडे,महेश आसुदानी विरुद्ध भादवी कलम 294,323,506,141,143,147 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय माकने करीत आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com