भारतीय रेल्वेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद

– एकाच दिवशी अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या सार्वजनिक सेवेच्या कार्यक्रमाला सर्वाधिक लोकांनी हजेरी लावण्याचा भारताचा विक्रम

नवी दिल्ली :- एकाच दिवशी अनेक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक सेवेच्या कार्यक्रमाला सर्वाधिक लोकांनी हजेरी लावण्याचा विक्रम नोंदवल्याबद्दल, भारतीय रेल्वेची नोंद प्रतिष्ठेच्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

रेल्वे मंत्रालयाने 26 फेब्रुवारी 2024 रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये 2,140 ठिकाणी 40,19,516 लोक उपस्थित होते.

हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वे मार्गावरून/खालून जाणाऱ्या पुलांचे उद्घाटन आणि रेल्वे स्थानकांच्या पायाभरणीसाठी आयोजित करण्यात आला होता.

एकाच वेळी अनेक जणांना एकत्र आणण्याच्या या प्रयत्नांची दखल घेतली गेली, आणि भारतीय रेल्वेला प्रतिष्ठेच्या लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान मिळाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बय्या नल्लामुत्थू यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Sun Jun 16 , 2024
मुंबई :- आज मुंबईत संपन्न होत असलेल्या 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्घाटन समारंभात, प्रख्यात पुरस्कार विजेते वन्यजीव चित्रपटकार सुब्बय्या नल्लामुत्थू यांना यावर्षीचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि महाराष्ट्राचे संस्कृती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माहितीपट आणि भारतामधील ही चळवळ यामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या चित्रपट निर्मात्याला मिफ्फच्या प्रत्येक आवृत्तीमध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com