सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ८६ प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. बुधवार (ता.१४) रोजी उपद्रव शोध पथकाने ८६ प्रकरणांची नोंद करून १ लाख ०७ हजार १०० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत २0 प्रकरणांची नोंद करून ८००० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०५ प्रकरणांची नोंद करून ५०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०५ प्रकरणांची नोंद करून २००० रुपयांची वसुली करण्यात आली.

मॉल, उपहारगृह, लोजिंग, बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालय कॅटरस सव्हीसेस प्रोव्हायडर आदींनी रस्तावर कचरा टाकणे या याअंतर्गत ०४ प्रकरणांची नोंद करून ८००० रुपयांची वसुली करण्यात आली.

वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ११ प्रकरणांची नोंद करून ५७००० रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गराज व इतर दुरुस्तीचे क्याव्सायीकाने रस्ता, फूटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०१ प्रकरणाची नोंद करून १००० रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा / टाकावू कचरा टाकणे/ साठवणे प्रथम या अंतर्गत ०१ प्रकरणाची नोंद करून ५००० रुपयांची वसुली करण्यात आली.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास ३३ प्रकरणांची नोंद करून रु ६६०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०४ प्रकरणांची नोंद करून रु ४००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका, कचरा जाळून उपद्रव निर्माण करणे याअंतर्गत प्रकरणांची नोंद करून रुपयांची वसुली करण्यात आली. हरित लवाद यांनी दिलेल्या दि, ०३/०७ / २०१७ च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह व लॉन्स यावर कार्यवाही करणे या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून १५००० रुपयांची वसुली करण्यात आली.ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभागीय आयुक्त कार्यालयात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन  

Thu Feb 15 , 2024
नागपूर :- संत सेवालाल महाराज यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात नायब तहसीलदार आर.के. दिघोळे, विवेक राठोड, नितीन डोईफोडे, नाझर अमित हाडके यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!