– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. बुधवार (ता:२०) रोजी उपद्रव शोध पथकाने ७० प्रकरणांची नोंद करून ४५ हजार ८०० रुपयाचा दंड वसूल केला.
स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत १४ प्रकरणांची नोंद करून ५ हजार ६०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०९ प्रकरणांची नोंद करून ९०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून ४०० रुपयांची वसुली करण्यात आली.
वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत १० प्रकरणांची नोंद करून २० हजार ५०० रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून १ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास २२ प्रकरणांची नोंद करून ४ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास १३ प्रकरणांची नोंद करून १३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या ०२ प्रकरणांची नोंद*
मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे बुधवार (ता: २०) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ०२ प्रकरणांची नोंद करून १० हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय रस्ता आणि पादचारी मार्गावर माती आणि वाळू टाकल्या प्रकरणी धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या रोहित खुल्लर(बिल्डर) यांच्यावर कारवाई करीत १० हजार रुपयाचा दंड वसूल केला. तसेच रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविणे या अंतर्गत धंतोली झोन येथील मे. गुरुमाऊली अपार्टमेंट, शिल्पा सोसायटी मनीष नगर यांच्यावर कारवाई करीत १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. असे एकूण ०७ प्रकरणाची नोंद करून ५० हजार दंड वसूल करण्यात आला.