सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या १०२ प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. गुरुवार (ता:२१) रोजी उपद्रव शोध पथकाने १०२ प्रकरणांची नोंद करून ४९ हजार ७०० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत ३४ प्रकरणांची नोंद करून १३ हजार ६०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०४ प्रकरणांची नोंद करून ४०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत १० प्रकरणांची नोंद करून ४ हजार रुपयांची वसुली करण्यात आली.

मॉल, उपहारगृह,लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०४ प्रकरणांची नोंद करून ८ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ०५ प्रकरणांची नोंद करून ०३ हजार ५०० रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गराज व इतर दुरुस्तीचे व्यावसायिकांने रस्ता फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून ०१ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास ३१ प्रकरणांची नोंद करून ०६ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास १३ प्रकरणांची नोंद करून १३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. अशा एकूण १०२ प्रकरणांची नोंद करून ४९ हजार ७०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या ०३ प्रकरणांची नोंद*

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे गुरवार (ता: २१) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ०३ प्रकरणांची नोंद करून १५ हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविणे या अंतर्गत धंतोली झोन येथील मे. गंगल हेलाईट मनीष नगर आणि मंगळवारी झोन येथील दिवेदी विला, वाहब ले आउट, प्लॉट क्र. १७ जुना मानकापूर यांच्यावर कारवाई करीत प्रत्येकी १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. असे एकूण ०७ प्रकरणाची नोंद करून ४५ हजार दंड वसूल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

The Madha Seat Conspiracy !!

Fri Mar 22 , 2024
If there is anything that BJP needs to take action on seat allocation or give it a re-think it has to be the Madha Lok Sabha constituency. There is an uproar over the declared BJP candidate Ranjitsinh Naik Nimbalkar for this constituency and the one family that is standing right in front opposing this candidature with few lakh people’s support– […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com