सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या १०० प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवारी (२०) रोजी शोध पथकाने १०० प्रकरणांची नोंद करून ५६२०० रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी लघुशंका विसर्जन करणाऱ्या एका व्यक्ती वर ५०० रु चा दंड लावण्यात आला. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत २६ प्रकरणांची नोंद करून १०४०० रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत १८ प्रकरणांची नोंद करून १८०० रुपयांची वसुली करण्यात आली.दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत २ प्रकरणांची नोंद करून रु ८०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत ४ प्रकरणांची नोंद करून रु ८००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद या अंतर्गत ९ प्रकरणांची नोंद करून रु ११५०० दंड वसूल करण्यात आला.

या व्यतिरिक्त इतर २१ व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून ४२०० रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणा-या संस्थांकडून १९ प्रकरणांमध्ये १९००० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Rojgar Mela is a big step towards India's self-reliance - Union Minister of State for Environment and Climate Change Ashwini Kumar Choubey

Sat Jan 21 , 2023
– 108 candidates who got jobs in various 14 departments of the Central Govt. given appointment letters under Rojgar Mela Nagpur :-108 candidates who got jobs in various 14 departments of Central Government namely Geological Survey of India, Indian Bureau of Mines, Income Tax, Postal Department, Statistics Department, Employees Provident Fund Organisation, AIIMS, Employees Insurance Society Corporation, Central Board of […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!