विभागीय लोकशाही दिनात 3 तक्रारी प्राप्त

नागपूर :- विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या विभागीय लोकशाही दिनात तीन तक्रारी प्राप्त झाल्या. उचित कार्यवाहीचे आदेश विभागीय आयुक्तांनी संबंधीत शासकीय यंत्रणांना दिले.

भंडारा जिल्ह्याच्या मांडवी तालुक्यातील कोटांगले येथील नागरिकाची नैसर्गिक नाला व पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत जुन्या तक्रारी आणि नागपुरातील गांधी झोन मधील अतिक्रमणाबाबत दोन तक्रारींवर आज सुनावणी झाली.

भंडारा जिल्ह्याच्या तक्रारीवर येत्या महिनाभरात कार्यवाही करून याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नागपूर महानगरपालिकेबाबत प्राप्त प्रकरणात शासकीय नियम व नोंदीच्या आधारे अहवाल स्वीकारण्यात आला. या प्रकरणातील उर्वरित विषय नझुल जागेवरील अतिक्रमणाचा असल्याने ही तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर या दोन्ही प्रकरणातील तक्रारदार अनुपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सिंधी साहित्याचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान - सांस्कृतिक मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे गौरवोद्गार

Mon Sep 9 , 2024
– महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे पुरस्कार प्रदान चंद्रपूर :- आपण सनातन संस्कृतीत ऋग्वेदाचा उल्लेख करतो. या महान ग्रंथात सिंधू आणि सिंध या शब्दांचा नऊवेळा उल्लेख आहे. ही एक महान संस्कृती आहे. त्यामुळेच सिंधी संस्कृतीचा उल्लेख होतो तेव्हा पर्यायाने राष्ट्रभक्तीचाही उल्लेख होतो. या समाजाने निर्माण केलेल्या साहित्याचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. या साहित्यातील संदेश, त्यातील भाव आणि आशय समाजाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!