निवडणुकीसाठी ‘तयार है हम’!

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- आज 23 जानेवरीला लोकसभेची अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून रामटेक लोकसभा अंतर्गत येणाऱ्या कामठी-मौदा विधानसभामध्ये मोडनाऱ्या कामठी-मौदा-नागपूर मध्ये एकूण 499 बूथ अंतर्गत 4 लक्ष 60 हजार 525 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.या मतदारांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आगामी रामटेक लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार करीत आयपासूनचव तयारी सुरू केली आहे.त्यातच प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी पक्ष आपल्यालाच संधी देणार असा विश्वास जनतेमध्ये निर्माण करून शिवसेनाचे(शिंदे गट) विद्यमान खासदार कृपाल तुमाणे ,कांग्रेसकडून सेवानिवृत्त जिल्हाधिकारी किशोर गजभिये भेटीगाठी, कार्यक्रमात आवर्जून उपस्थिती दर्शवून जनतेमध्ये पोहीचविण्याचे काम सुरू केले आहे.असे असले तरी यांना उमेदवारी तिकिटांची शाश्वती तेवढ्या विश्वासाने दिसून येत नसल्याची चर्चा जनतेत रंगत आहे.

लोकसभा व विधानसभेचा पंचवार्षिक कार्यकाळ चालू वर्षात संपुष्टात येत आहे.लोकसभा निवडणूक मार्च महिन्याच्या पहील्या आठवड्यात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुका ही लागणार असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे .या अनुषंगाने राजकीय पक्ष व पक्षातील पुढारी एक्शन मोड वर आले असून निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत.रामटेक लोकसभा मतदार संघात प्रतिनिधित्व करणारे निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.भेटीगाठी व विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आगामी निवडणुकीसाठी ‘तयार है हम’असा संदेश देत आहेत.त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या रिंगणात पक्ष आपल्यावरच विश्वास दर्शवून उतरविणार ,असेही आपल्या सक्रियेतून समर्थक कार्यकर्त्यांसह जनतेला दाखवीले जात आहे.

-विद्यमान खासदारांचे भवितव्य

-सध्या रामटेक लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व सलग शिवसेनेतून दोनदा निवडून आलेले खासदार कृपाल तुमाणे प्रातिनिधीत्व करीत आहेत.तिसऱ्यांदाही निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी सुद्धा तयारी सुरू केली आहे तेव्हा या मतदार संघात विद्यमान खासदार कृपाल तुमाणे यांना महायुती पुन्हा संधी देणार की नाही?अशी चर्चा सुरू झाली आहे तसेच मागिल निवडणुकीत याच मतदार संघात प्रतिस्पर्धी असलेले कृपाल तुमाणे यांनी पराभव केलेले कांग्रेस चे उमेदवार माजी जिल्हाधिकारी किशोर गजभिये यांना महावीकास आघाडी संधी देणार की नाकारणार की नवा चेहरा देणार?याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी-मौदा विधानसभा मतदार संघातील 4 लक्ष 60 हजार 525 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Tue Jan 23 , 2024
  संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून आज 23 जानेवरीला अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान कामठी-मौदा विधानसभा अंतर्गत येणाऱ्या कामठी तालुका, मौदा तालुका ,तसेच नागपूर ग्रामीण क्षेत्र मिळून 4 लक्ष 60 हजार 525 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती तहसीलदार अक्षय पोयाम यांनी दिली. आगामी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!