नागपूर :-महा बास्केटबॉल संघटनेच्या नुकत्याच नागपुर येथे झालेल्या निवडणुकीत नागपूर चे धनंजय वेळूकर यांची अध्यक्ष पदी व शत्रुघ्न गोखले यांची सचिव पदी फेरनिवड करण्यात आली. दिनांक 5 नोव्हेंबर रोजी नागपुरात झालेल्या निवडणुकीत विविध जिल्हयांचे प्रतीनिधी उपस्थित होते. महा बास्केटबॉल संघटनेची स्थापना सन 2019 मध्ये नागपूर येथे करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील बास्केटबॉल खेळाच्या प्रचार प्रसार, स्पर्धा नियोजन व प्रशिक्षण शिबिरे इत्यादि साठी या संघटनेची स्थापना झाली होती. जून 2022 रोजी भारतीय बास्केटबॉल महासंघाने महा बास्केटबॉल संघटनेला मान्यता दिली. त्यानंतर सातत्याने महा बास्केटबॉल संघटनेद्वारे महाराष्ट्रात विविध वयोगतील राज्य अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच यातून निवडलेल्या महाराष्ट्र संघांनी विविध राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करून सुवर्ण, रौप्य तसेच कास्य पदके मिळविली. महा बास्केटबॉल संघटनेचा 4 वर्षेचा कालाविधी 2023 मध्ये संपत आल्याने संघटनेतर्फे निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये मुंबई शहर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, संभाजीनगर (औरंगाबाद), धाराशीव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा इत्यादि जिल्ह्याचे प्रतीनिधी उपस्थित होते.
बैठकीत निवड झालेले सदस्य खालीलप्रमाणे
कार्यकारिणी: धनंजय वेळूकर अध्यक्ष, ज्ञानेश्वर झळके उपाध्यक्ष, पुराण गांगतिरे उपाध्यक्ष, सचिन गाईवळ उपाध्यक्ष, राकेश तिवारी उपाध्यक्ष, शत्रुघ्न गोखले सचिव, गणेश कड सह सचिव, शशिकांत नांदगावकर सहसचिव, जयंत देशमुख कोषाध्यक्ष, अमित बुद्धे, अनंत पांडे, राजेश क्षत्रीय, अमजद काद्री, मोहम्मद उस्मान, जयदीप काहलेकर, सूर्यकांत इलमे (सर्व सदस्य)
तांत्रिक समिति: धनंजय वेळूकर चेअरमन, मनोज रेड्डी, कैलाश पवार, सचिन पाटील, राकेश माहेश्वरी, जितेंद्र शिंदे, शत्रुघ्न गोखले(एक्स ओफिशिओ)
पंच समिति: अमर कानडे चेअरमन, गोविंद पाटील, सुहास कांबळे, सदत खराडी, संदीप धनगरे, राकेश सेठ, स्वप्नील बनसोड, मजीद खान, शत्रुघ्न गोखले(एक्स ओफिशिओ)
निवड समिति पॅनल: जयंत देशमुख चेअरमन, राजेश क्षत्रीय, आनंद द्रविड, मनोज पैंजणे, मुद्रा अग्रवाल, हेमंत निपाणे, भावेश मोरे, रोहण गुजर, उदय पाटील, तौफिक खान, सुधीर नागवेकर, शत्रुघ्न गोखले(एक्स ओफिशिओ)