नागार्जुन टेकडी वाचविण्यासाठी संघटित व्हा

-भदंत ससाई यांचे आवाहन

-बोधीसत्व नागार्जुन महाविहारात नागार्जुन मेळावा

नागपूर :- एतिहासिक नागार्जुन टेकडी वाचविण्यासाठी इतिहास प्रेमी, पर्यटक, संशोधक आणि सामाजिक संघटनांनी संघटीत व्हावे, असे आवाहन दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले.

बोधीसत्व नागार्जुन महाविहार, नागार्जुन टेकडी परिसर, रामटेक येथे आयोजित नागार्जुन मेळावा आणि संरक्षक महोत्सवाप्रसंगी ससाई बोलत होते. देशातील प्राचीन इतिहासापैकी नागार्जुन टेकडी हे एक स्थान आहे. या प्राचीन स्थानाचे जतन, संवर्धन करणे शासनाची जबाबदारी आहे. मात्र, अलिकडे नागर्जुन टेकडीचे अस्तीत्व धोक्यात आले आहे. प्राचीन टेकडी वाचविण्यासाठी दर वर्षी संघर्ष दिन पाळल्या जातो. या माध्यमातून संशोधक, इतिहास प्रेमी, पर्यटक आणि सामाजिक संघटेनेशी जुळलेल्या बांधवांना या टेकडीचे महत्व सांगितले जाते. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार 18 फेब्रुवारी रोजी संघर्ष दिन पाळण्यात आला.

प्रारंभी तथागत गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ससाई यांनी सामुहिक बुध्द वंदना घेतली. तसेच बोधीसत्व नागार्जुन समाधीस्थळी अभिवादन करून बुध्द वंदना घेण्यात आली. या मेळाव्याला नागपूर, रामटेक, भंडारा आदी शहरातील उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या. याप्रसंगी भीम बुध्द गीतांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. मेळाव्या निमीत्त भीम बुध्द साहित्य विक्री, बुध्द मुर्ती विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणावर स्टाल्स लागले होते. उपस्थितांना भोजनादान देण्यात आले.

कार्यक्रमाला भंते नागसेन, भंते धम्मविजय, भंते भीमा बोधी, भंते अश्वजित, भंते धम्मप्रकाश, भंते धम्मबोधी, भंते महानाग, भंते मिलिंद, भंते धम्मसारथी, भंते राहुल, भिक्षुनी संघप्रिया, कीसागौतमी, पोर्णीमा सामाजिक कार्यकर्ते रवी मेंढे यांच्यासह इतिहास प्रेमी, पर्यटक, संशोधक आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com