रनाळ्यात जागतिक महिला दिनाच्या पर्वावर हवेली बियर बार बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

 -संदीप कांबळे ,कामठी

-पोलीस अधिकारी व पोलीस व उत्पादनशुल्क अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे पुढील अनर्थ टळला

कामठी ता प्र 8:- स्थानिक ,नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कामठी -कळमना मार्गावरील रनाळा महावीर नगर परिसरातील हवेली बियर बार बंद करण्याच्या मागणीसाठी जागतिक महिला दिनाच्या पर्वावर महिलांनी आत्मदहनाचा प्रयत्न करताच पोलीस व उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे पुढील अनर्थ टळला . नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामठी कळमना मार्गावरील महाविर नगर परिसरातील हवेली बियर बार गेल्या सहा महिन्यापासून सुरू झाला असता ग्राम संरक्षण दल व स्थानिक नागरिकांनी सदर बिअरबार मुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न होत असल्यामुळे नवीन कामठी पोलीस स्टेशन ,कामठी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेकदा तक्रारी आंदोलन करून बिअरबार बंद करण्याची मागणी केली होती तकारीची दखल घेत 24 फरवरी 2022 ला जिल्हाधिकारी नागपूर यांच्या आदेशानुसार सदर बियरबार बंद करण्यात आला होता बियर बार मालकाने मुंबई येथील उत्पादन शुल्क आयुक्त आदेशामुळे सदर बियर बार 26 फरवरी 2022ला सुरू करण्याचे आदेश दिले होते. बार सुरू होताच आज जागतिक महिला दिनाच्या पर्वावर ग्राम संरक्षण दलाचे विदर्भ अध्यक्ष व कामठी नगर परिषदेच्या माजी अध्यक्ष माया चौरे यांच्या नेतृत्वात महिलांनी बियर बार समोर येऊन नारेबाजी करून बियरबार बंद करण्याची मागणी केली व बियर बार बंद न केल्यास आत्मदहनाचा इशारा सुद्धा दिला होते ,उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नरेंद्र थोरात यांचे उपस्थितीत राज्य उत्पादन शुल्क विभागीय आयुक्त सोबत चर्चा करून सदर आत्मदहनाचा आंदोलन मागे घेण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले त्यामुळे जागतिक महिला दिनाच्या पर्वावर आत्मदहनचा दिलेला ईशारा मागे घेतल्याने पुढील अनर्थ टळला आत्मदहन आंदोलनात माया चौरे,लीना वंजारी, मयुरी कामडी ,कल्पना गायधने ,रेखा कडुसकर ,सारिका चंद्रिकापुरे ,अरविंदा शिंदे, जयश्री तालेवार, सविता म्हस्के, सकुंतला कडुसकर, हिरा कावळे ,अंजू यादव, सरला आरोडे , प्रभा नाचने, अंजू मून, सुजाता गणले सह महिला सहभागी झाल्या होत्या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, गीता रासकर ,अखिलेश ठाकूर सहा मोठ्या प्रमाणात कडक बंदोबस्त लावण्यात आला होता

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महावितरणच्या सावनेर विभागात महिलादिनी

Tue Mar 8 , 2022
थकबाकी भरणाऱ्या शेतकरी महिलेचा सन्मान सावनेर दि. ८ मार्च २०२२ : महिला दिनानिमित्त कृषी पंपाची वीज बिलाची थकबाकी भरणाऱ्या  शेतकरी महिलेचा  महावितरणच्या सावनेर विभागातील सर्व महिला कर्मचाऱ्यांनी सन्मान करून या शेतकरी महिलेला महिलादिनानिमित्त सुखद क्षणांची अनोखी भेट दिली. विशेष म्हणजे,सावनेर विभागाच्या कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवार या महिला असतानाही जोखिमेच्या वीज  वितरण क्षेत्रात प्रभावीरित्या कार्यरत असून त्यांनी या उपक्रमाचे आवर्जून कौतुक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com