पवित्र रमजान महिना आणि शुभ नवरात्रीमध्ये लोडशेडिंग होणार नाही:-मंत्री डॉ नितीन राऊत

संदीप कांबळे, कामठी

-काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली ऊर्जामंत्र्यांची भेट
कामठी ता प्र 3:- महावितरण कंपनीच्या ऊर्जा विभागाच्या वतीने १ एप्रिलपासून शहरातील सर्वसामान्य नागरिकांना या कडाक्याच्या उन्हामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागू शकतो तर सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे महासचिव व कामठी नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष शकूर नागानी, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस . अतीक कुरेशी यांनी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सांगितले की, पवित्र रमजान महिना 3 एप्रिलपासून सुरू होत असून शुभ नवरात्री 2 एप्रिलपासून सुरू झाली आहे. तेव्हा या पवित्र महिन्यात लोडशेंडिंग करण्यात येऊ नये यावर चर्चा केली.या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी रमजान आणि नवरात्रीच्या पवित्र महिन्यात लोडशेडिंग करू नये, असे आदेश ऊर्जा विभागाला दिले.
यावेळी गोपाल पट्टम, आशिष दीक्षित, वसीम खान, रवी गौर, मोहसीन अख्तर अन्सारी, वसीम कुरेशी, मो आबिद, इर्शाद मोल्डर, इझहर भाई, मुख्तार अन्सारी, जावेद कुरेशी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विश्वनाथ रहाटे स्मृती प्रित्यर्थ पाणपोईचा शुभारंभ

Sun Apr 3 , 2022
संदीप कांबळे,कामठी कामठी : – येथील प्रतिष्ठीत नागरिक विश्वनाथ रहाटे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या स्मृती चिरकाल टिकण्या साठी रहाटे कुटुंबीयांच्या वतीने पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला. स्व. सिताराम रहाटे स्मृती बहुउद्देशिय संस्था व फेमस क्लाथ स्टोर्स कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने तारसा रोड चौक कन्हान येथे स्व.विश्वनाथ रहाटे स्मृती प्रित्यर्थ जनसेवेकरिता पाणपोईचा आज (ता ३) शुभारंभ करण्यात आला. पाणपोईचे उद्घाटन  सुशीलाबाई रहाटे यांचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!