रामटेक – महाशिवरात्री निमित्त रामालेश्वर मंदिर , कोटेश्वर मंदिर नगरधन मध्ये अभिषेक ,महाप्रसाद ची धूम होती.भविकामधे उत्साह बघावयास मिळाला.शहरातील शिवमंदिर मध्ये शिवलिंगाला अभिषेक पूजा ,भजन , कीर्तन , आरती करण्यात आली. दिवस भर भक्तांनी उपवास ठेवला असल्याने काहींनी निरंकाल तर काही नी उपवास चा फराळ करून भूक भागविली.
महाशिवरात्री निमित्त माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी रामटेक तालुक्यातील नगरधन येथील कोटेश्वर महादेव मंदिर, तिलभांडेश्वर,अम्बालेश्वर, तसेच अनेक ठिकाणी महादेव मंदिराचे आपले मित्रमंडळी सह पूजा अर्चना करून दर्शन घेतले . यावेळी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी , आलोक मानकर, सुमित कोठारी ,अतुल पोटभरे, रितेश चौकसे , विनायक बान्ते, करीम मालाधारी व अन्य मान्यवर तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त होते.रामटेक परिसरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या हर्षोल्लास मध्ये साजरा केला….