– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई
कन्हान :- दिनांक ०९/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान उपविभागात गस्त करीत असतांना पोलीस स्टेशन मौदा हद्दीतील मौजा बडोदा शिवारातील मंगल थोटे यांचे शेता मधील खुल्या जागेत काही इसम हे ताम्रपत्त्यांवर पैशाची बाजी लावून अवैधरीत्या हारजीतचा जुगार खेळ खेळत असल्याचे गुप्त माहीती पथकास प्राप्त झाली. त्यावरून दिनांक ०९/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मौजा वडोदा शिवारातील मंगल चोटे यांचे शेता मधील खुल्या जागेत सापळा रचुन छापा टाकून एकुण ७ जुगारी इसम मंगेश श्रावण भुसारी, वय ३३ वर्ष, रा. अंबाडी केसोरी २) अतुल अशोकराव ठाकरे, वय ३२ वर्ष, रा. वार्ड नं. ०१. बडोदा ३) मयुर नागेश्वर गिरो वय ३० वर्ष रा. वार्ड नं. ०२. बडोदा ४) रमेश मोतीराम किरमरे, वय २१ वर्ष, रा. वार्ड नं. ०२ वडोदा ५) खुशाल भैयाराम सहारे, वय ३० वर्ष, रा. वार्ड नं. ०१ वडोदा, ६) सुरेंद्र युवराज मोटघरे, वय २८ वर्ष, रा. वार्ड नं. ०.२ वडोदा (७) मंगलमूर्ती नत्थुजी थोटे, वय ३९ वर्ष, रा. वार्ड नं. १ वडोदा यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन १) नगदी ६२,३४०/- रू. २) दरी ५००/- रु ३) ६ मोटार सायकल किंमती ६,३५,०००/- रू व इतर साहित्य असा एकुण ६,९७,५६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना जप्त मुद्देमालासह पोलीस ठाणे मौदा यांचे ताब्यात देण्यात आले असून त्यांचे विरुद्ध कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाणे मौदा करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण हर्ष ए. पोदार (भा.पो.से) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक बलाल पांडे, सहायक फौजदार नाना राऊत, पोलीस हवालदार विनोद काळे, इकबाल शेख, संजय बानोदीया, चालक मोनू शुक्ला यांचे पथकाने केली.