संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नया गोदाम येथे गुप्तचर पद्धतीने अवैधरित्या सुरू असलेल्या सट्टा पट्टी अड्यावर धाड घालण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाले असून या धाडीतून आरोपी अब्दुल गफ्फार उर्फ कल्लूला ताब्यात घेत कायदेशीर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले तसेच घटनास्थळाहूंन आरोपी कडून नगदी 3800 रुपये व सट्टा पट्टी साहित्य जप्त करण्यात आले.