संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयभीम चौक परिसरातील एका मोकळ्या जागेत बिनधास्तपणे सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्यात यशप्राप्त झाल्याची कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या नेतृत्वात मध्यरात्री 3 वाजता केली असून या धाडीतून पाच जुगाऱ्यांता ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध कायदेशोर गुन्हा नोंदवित सुचनापत्र देऊन सोडण्यात आले.या धाडीत नगदी 3100 रुपये व तास पत्ते,मोबाईल फोन, दरी असा एकूण 82 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जुगाऱ्यात संकेत राजेश फुले वय 30 वर्षे रा जयभीम चौक,कामठी,नयन आनंद ढोले वय 22 वर्षे,रा नया गोदाम,कामठी,प्रणय उर्फ बंटी राष्ट्रापाल वासनिक वय 22 वर्षे रा जयभीम चौक,कामठी, आकाश विजय कुरील वय 31 वर्षे रा जयभीम चौक,कामठी, शैलेश दशरा राऊत वय 30 वर्षे रा रमानगर,कामठी असे आहे .ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शनार्थ सहकारी पोलिसांनी केली.