दक्षिण-पश्चिम नागपूरातील “शासन आपल्या दारी” शिबिराचे उद्घाटन

नागपूर :- सर्वसामान्य जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांर्तगत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मतदारसंघ असणाऱ्या दक्षिण-पश्चिम नागपूरातील रामदासपेठ येथील मेजर आनंद खरे लेंड्रापार्क येथे गुरुवारी (ता२९) शासन आपल्या दारी विशेष शिबिराचे उदघाटन करण्यात आले. नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा एकाच छताखाली लाभ घ्यावा तसेच शिबिराला मोठ्या संख्येत भेट द्यावी असे आवाहन मान्यवरांनी यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी सुरेश बगळे, माजी खासदार  अजय संचेती, माजी आमदार सुधाकर देशमुख, मनपाचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, माजी नगरसेवक संजय बंगाले,  सुनील हिरणवार, प्रमोद कौरती, तेजेंद्र सिंह रेणू यांच्यासह नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

‘शासन आपल्या’ दारी अंतर्गत दक्षिण-पश्चिम नागपूरातील रामदासपेठ येथील मेजर आनंद खरे लेंड्रापार्क येथे २९ फेब्रुवारी ते २ मार्च २०२४ या दरम्यान विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासन आपल्या दारी अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली मिळत आहे. शासनाच्या विविध विभागाच्या सोयीसुविधा देखील एकाच ठिकाणी प्राप्त होत असल्याने अधिकाधिक संख्येत नागरिकांनी या शिबिराला भेट देत लाभ घ्यावा असे आवाहनही मान्यवरांनी यावेळी आपल्या भाषणात केले.

नागरिकांना शिबिरात नगर भूमापन सिटी सर्व्हे, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय सेतू केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभाग, नागपूर महानगरपालिका, अन्न व नागरी पुरवठा विभाग, बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा कार्यालय आदी विविध विभागांच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

In 3 Minutes, Brahmins of Maharashtra will be finished!

Fri Mar 1 , 2024
Yes, this is a statement coming from a leader of a political party of Maharashtra. The caste based politics just refuses to die in our state of Maharashtra. We might be Number 1 in many things, but we must be in the bottom 3 if someone ever measured ‘caste based politics and its aftermath’. Today people are yet trolled for […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com