संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलनादरम्यान भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाळण्याचे विकृत कार्य केल्याबद्दल त्यांच्या या कार्याचा भारतीय जनता पार्टी कामठी तालुक्याच्या वतीने निषेध करून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन कारवाई करण्याच्या मागणीसाठी नवीन कामठीचे ठाणेदार प्रमोद मोरे यांना निवेदन दिले जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे यांच्या नेतृत्वात नवीन कामठीचे ठाणेदार प्रमोद मोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील आंदोलनादरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून देशातील सर्व समाजातील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत जितेंद्र आव्हाड यांच्या मनोविकृतीचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करून त्यांचे वर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
नवीन कामठीचे ठाणेदार प्रमोद पोरे यांना निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, कामठी तालुका भाजप अध्यक्ष उमेश रडके, माजी उपसभापती देवेंद्र गवते, माजी सरपंच मंगला कारेमोरे, माजी सरपंच मनीष कारेमोरे, इश्वरसिग चौधरी,उपसरपंच मंदा महल्ले पाटील, जया भस्मे,उन्मेष महाले ,राजेश पिपरेवार, ग्रामपंचायत सदस्य नरेश मोहबे,अनिल भोयर, राजश्री धीवले, राजेंद्र चौरे, जॉनी भस्मे, मुकेश कनोजिया, स्वप्निल झंझोटे, स्वप्निल ढोबळे, राजन वाडीभस्मे, कुबेर महल्ले, विशाल नाटकर ,सुषमा राखडे ,रेखा मराठे, वनिता नाटकर ,सरिता भोयर ,प्रवीण आगाशे ,रामकृष्ण बोधारेश मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.