काँग्रेस पक्षाने एका सच्चा व अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या नेत्याला गमावले – डॉ. नितीन राऊत
नागपूर :-काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा सोमवारी रात्री नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली. देगलूरमधून सकाळी सहा वाजता पदयात्रेला पुन्हा सुरुवात झाली होती. दिवं. कृष्णकुमार पांडे हे पहाटे सहा वाजता ध्वज वंदना करुन राहुल गांधी यांच्या सोबत कॉग्रेसच्या ध्वज आपल्या खांदयावर घेवून भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळेस कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगविजय सिंग व जयराम रमेश हे चालत होते. पांडेनी त्यांच्या सोबत फोटो पण घेतला यात्रेतील ॲम्बुलन्स मध्ये फर्स्ट अेड घेवून नजीकच्या नायगाव येथील ग्रामिण रुग्णालयांत सेवादलाचे त्यांचे सहकारी मो. कलाम व इतरांनी नेले असतांना डॉक्टरांनी त्यांना तेथे मृत घोषित केले. मात्र, अटकळी जिल्हा नांदेड येथे वैशाली नगर, नागपूर निवासी काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांचे हृदयविकाराने निधन झाले.
के.के. पांडे यांच्यावर शवविच्छेदन झाल्यानंतर राहुल गांधी यांच्या शिबिरस्थळी त्यांचा पार्थिव देह नेण्यात आला. राहुल गांधी यांनी पुष्प अर्पण करुन पांडे यांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी श्री के.सी. वेणुगोपाल, महासचिव, भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिगविजय सिंह, अखिल भारतीय युवक कॉग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास, एच.के. पाटील, प्रभारी महाराष्ट्र प्रदेश, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले, कॉग्रेस विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हान, आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, अमर राजुरकर, सचिन राव, संपत कुमार, राजा करवाडे, समन्वयक, अखिल भारतीय अनुसूचित जाती, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी यादव, कुणाल राऊत, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेस व दिवं. पांडे यांचे सुपूत्र शिलजरत्न पांडे त्यांचे पुतणे अनिरुध्द पांडे जिल्हा अध्यक्ष एन.एस.यु.आय. सह कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
नागपूर येथे राज्याचे माजी ऊर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही शोक व्यक्त केला.
अतिशय मनमिळावू आणि अभ्यासू नेते म्हणून के.के. पांडे परिचित होते. काँग्रेसचे निष्ठावान म्हणूनही ते ओळखले जात. काँग्रेसची राजकीय स्थिती विपरीत असतानाही पक्षाच्या जून्या कार्यकर्त्यांची एक फळी त्यांनी नेटाने टिकवून ठेवली होती. त्यांना दिलेली जबाबदारी अतिशय चोखपणे ते पार पाडीत असत. पक्ष संघटनेचा त्यांना दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांना पक्ष संघटनेतील अनेक कार्यक्रमांमध्ये महत्वाची जबाबदारी दिली जात असे. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य सेवादलाला समर्पित केले होते. त्यांच्या निधनामुळे पक्षाचे फार मोठे नुकसान झाले आहे आणि पक्षाने एक महत्वांचा निष्ठावंत नेता मी तर माझा जीवलग भावा सारखा असणारा एकनिष्ठ सहकारी गमवला आहे. अशा शब्दात डॉ. नितीन राऊत यांनी शोक व्यक्त करत आपल्या संवेदना प्रकट केल्या.
के.के. पांडे यांचे आकास्मिक निधन झाल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे, प्रियंका गांधी वाडेरा, महासचिव, काँग्रेस कमिटी, सुप्रिया श्रीनेत व अनेक नेत्यांनी टविटरव्दारे शोक संवेदना व्यक्त केल्या.
आज मंगळवार रात्री नांदेड येथून त्यांचे पार्थिव नागपुरात येणार असून त्यांचे निवासस्थान १३१, केदार धाम, मिलिंद नगर, नागपूर येथे त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येईल. उद्या बुधवारी दि ९/११/२०२२ सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थान येथून अंत्ययात्रा निघून वैशाली दहन घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.