आदिवासी महिलेवर अन्याय करण्याऱ्यांना शिक्षा द्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परिषदेचे निवेदन

नागपूर :- दिनांक १२ जुलाई बुधवारला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा शाखेतर्फ़े राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.२३ जुन २०२३ ला पहापळ येथिल एका आदिवासी कोलाम समाजातील ४० वर्षीय महिलेवर गावातिल चार ते पाच जणांनी मिळुन बलात्कार केला.त्यानंतर तिच्यावर विषप्रयोग करुन तिला मरणावस्तस्थितीत तिच्याच घराशेजारी पहाटे दरम्यान आणुन सोडुन दिले. उपचारा दरम्यान त्या महिलेचा २६ जुन रोजी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात मृत्यु झाला. या प्रकरणात पोलिस आरोपी विरुध्द गुन्हे दाखल करण्यास तयार नसल्याने आदिवासी समाज बांधवातुन तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे केळापुर तालुक्यासह जिल्ह्यात आदिवासी चे दोन आमदार आहे. त्यापैकी एकही आमदाराने या आदिवासी कोलाम समाजातिल महिलेवर झालेल्या अन्याया विरुद्ध अद्याप पर्यंत एकही आवाज काढलेला नाही.पहापळ येथिल कोलाम आदिवासी समाजाच्या महिलेला २३ जुन २०२३ रोजी रात्री तिच्या घरुन चार ते पाच जणांनी उचलून नेले होते.रात्रभर त्या आरोपींनी तिच्यावर अत्याचार करुन तिला दुसऱ्या दिवशी पहाटे तिच्या घराशेजारी आणुन सोडुन दिले. त्या महिलेची प्रकृती खराब झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान २६ जुन रोजी त्या महिलेचा यवतमाळ येथिल शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी १५ दिवसाच्या कालावधी लोटून असतांना सुध्दा गुन्हे दखाल केले नाही. एका आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार करुन नंतर तिच्यावर विषप्रयोग करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार आदिवासी राखीव मतदार संघातच घडलेला आहे. ज्या पहापळ गावात आदिवासी महिलेवर अत्याचार झाला ते गाव सुध्दा केळापुर-आणॅी या आदिवासी विधानसभा मतदार संघात येते.तसे पाहिल्यास तालुक्यास दोन्ही आदिवासी आमदार लाभलेले आहेत.परंतु ते आदिवासींच्या समस्येवर व अन्याया विरुध्द आवाज उठवितांना दिसून येत नाही. आपल्याच आदिवासी मतदार संघातील झालेल्या महिलेवर अन्याया विरुध्द आवाज आपले लोकप्रतिनिधि उचलत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.आरोपिनां कडक शिक्षा व्हावी. असे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश युवा कार्याध्यक्ष आकाश मडावी, विदर्भ युवा अध्यक्ष संतोष आत्राम, विनोद मसराम, कार्याध्यक्ष शुभम आत्राम, कुणाल कोवे, मयूर कोवे, सागर इवनाते, आदि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोटर सायकल चोरी करणारा गुन्हेगार गजाआड

Thu Jul 13 , 2023
– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिणची कारवाई  नागपूर :-फिर्यादी देविदास नामदेव मेंढे, वय ४० वर्ष रा. उदापुर ता. रामटेक हे दि. ०८/०७/२०२३ रोजी सायंकाळी ०६/३० वा. दरम्यान नगरधन येथील पाणठेल्यावर खर्रा आणण्यासाठी गेले असता फिर्यादीने आपली मोटर सायकल पाणठेल्याजवळ ठेवली होती. फिर्यादी यांची हिरो होन्डा सिडी डिलक्स काळया रंगाची लाल पट्टे असलेली जिचा क्रमांक MH-40-H-6309 असा असुन जिचा चेवीस क्रमांक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com