वणी येथील धनोजे कुणबी समाज संघटना, रजनीकांत बोरले मित्र मंडळ आणि प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचा सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा

– चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत ना. मुनगंटीवार यांची प्रचारात आघाडी

चंद्रपूर :- वणी येथील धनोजे कुणबी समाज संघटना,आणि रजनीकांत बोरले मित्र मंडळ या दोन्ही सामाजिक संघटनेसह प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीने चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पिरीपा (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा दिला आहे.

लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर ना. मुनगंटीवार यांनी काल पांढरकवडा वणी तालुक्यांना भेटी देत अनेक संघटनांशी संवाद साधला. यावेळी धनोजे कुणबी समाज संघटनेच्या पदाधिकारी मंडळींनी त्यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून आपला जाहीर पाठींबा दिला. याप्रसंगी त्यांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा गळ्यात घालून सर्वांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये संध्या नांदेकर, रुंदा नगरकर, रुंदा केचे, स्वप्ना बोंडे, स्नेहा झाडे, एकटा झाडे, सुचिता आसेकर, सोमा गाडगे, नीता तिवारी यांच्यासह अनेकांनी पक्ष प्रवेश केला आहे. तर मागील अनेक वर्षांपासून वणी येथे सामाजिक कार्य करीत असलेल्या रजनीकांत बोरले मित्र मंडळ कार्यरत आहे. अनाथ मुलींचे लग्न लावने, वृद्धाश्रमला मदत करने, गोर, गरीब, वंचित समाजातील घटकांसाठी दिवसरात्र मेहनत करून त्यांना न्याय मिळवून देणे यासारखी विविध कामे हि संघटना करीत आहे. या संघटनेचे प्रमुख रजनीकांत बोरले आणि त्यांच्यासर्व कार्यकर्त्यांनी ना. मुनगंटीवार यांना पाठींबा देत जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचा संकल्प केला आहे. यावेळी आ. डॉ. संदीप धुर्वे, आ. प्रा. अशोक उईके, शंकरराव बडे डॉ. अंगाईतकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. त्याचसोबत प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीने लोकसभा उमेदवार ना. मुनगंटीवार यांनी जाहीर पाठींबा दिला आहे. याप्रसंगी प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे विदर्भ अध्यक्ष रेवनाथ वालदे, विदर्भ सचिव राकेश निमसरकारी, जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मेसरे, अखिल गेडाम, जिवन निमगडे, जितेंद्र करमनकर, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

केमिस्ट फार्मासिस्ट प्रकोष्टने केला विजयाचा निर्धार

वणी, झरी, पांढरकवडा, मारेगाव आदी तालुक्यातील भाजपा केमिस्ट फार्मासिस्ट प्रकोष्टतर्फे स्नेह मिलन सोहळा आयोजित करून ना. मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणुकीत निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी केमिस्ट फार्मासिस्ट प्रकोष्टच्या अडचणी सोडविण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रदेश संयोजक श्रीकांत दुबे, मुकुंद दुबे, आ. डॉ. संदीप धुर्वे, आ. प्रा. अशोक उईके, भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोरडे, रवी येरणे, लक्ष्मण उरकुडे, शंकर नागदेव, बाबाराव बोबडे, धनंजय जोशी यांच्यासह अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Governor offers tribute to Dr Ambedkar on 133rd Birth Anniversary

Mon Apr 15 , 2024
Mumbai :-The Governor of Maharashtra Ramesh Bais offered floral tributes to Bharat Ratna Dr B R Ambedkar at the Chaitya Bhoomi Memorial in Mumbai on the occasion of the 133rd Birth Anniversary of the Architect of the Indian Constitution on Sun (14 April). The trisharan Buddha Vandana was recited on the occasion. The Governor presented the holy clothes (Cheevar) to […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com