संदीप कांबळे, कामठी
-कुठे गेले समाजाचे कैवारी?
कामठी ता प्र 2:-पूर्वी उन्हाळ्याची चाहूल लागताच माणुसकीच्या नजरेतून मुख्य ठिकाणी सार्वजनिक प्याऊ ची व्यवस्था करण्यात येत होतो.उन्हाळा लागून महिना लोटून गेला तर सूर्य आग ओकतोय तरीसुद्धा उन्हाळ्यात लावण्यात येणारे सार्वजनिक प्याऊ ची व्यवस्था दिसुन येत नसून सार्वजनिक प्याऊ आता दुर्मिळ झाले आहेत .तहाणलेल्याना पाणी पाजणे हे अति पुण्याचे काम असताना मात्र आता हे सार्वजनिक प्याऊ दिसत नसल्याने समाजसेवेचा खोटा आव आणणारे नेते , गावपुढारी कुठे गेले?या चर्चेला उधाण आले आहे.
तहाणलेल्याना पाणी पाजणे हे फार मोठे पुण्याचे काम आहे व हे पुण्याचे काम लक्षात घेता काही वर्षांपूर्वी कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात मुख्य ठिकाणी सार्वजनिक प्याऊ ची व्यवस्था करण्यात येत होती मात्र आता हे सार्वजनिक प्याउ दिसून येत नाही, तर पूर्वीचे असलेले प्याऊ ओसाड स्थितीत आहेत.छोट्या, मोठ्या दुकानात , टपऱ्यावर पाणी बॉटल उपलब्ध होत असल्याने पाणी प्याऊ ची जागा आता विकत मिळणाऱ्या पाण्याच्या बॉटल ने घेतली आहे उन्हाळा लागला की गाव असो की शहर असो, गर्दीच्या ठिकाणी हमखास पाण्याचे प्याऊ दिसायचे त्यामुळे बाहेरून येणाऱ्या थकलेल्या भागलेल्या व्यक्तीच्या पिण्याच्या पाण्याने तहान भागून आत्मा तृप्त व्हायच्या .या सार्वजनिक प्याऊ च्या माध्यमातून माणुसकीचे दर्शन व्हायचे मात्र यासारख्या माणुसकीचे दर्शन करणारे समाजाचे कैवारी कुठे भूमिगत झाले की काय?अशी स्थिती असल्याने उन्हाळा आग ओकत आहे.नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.मात्र सार्वजनिक प्याऊ कोरोना काळातील दो गज की दुरी …या धोरणाची भूमिका साकारून नामशेष झाले आहेत.
कामठी तालुक्यात सार्वजनिक प्याऊ झाले दुर्मिळ
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com