नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ४, चे अधिकारी व अंमलदार यांनी सकाळी मॉर्निंग वॉक करीता येणारे जाणारे जनतेला नंदनवन गार्डन मध्ये, गोळा करून जनतेशी, सिनीअर सिटीजन व सुजान नागरीकां सोबत संवाद साधुन नागपूर शहरामध्ये होणाऱ्या वैन स्नॅचिंग व घरफोडी सारखे गुन्हया बाबत माहिती देवुन त्यांना सकाळी घराचे बाहेर निघतांना अंगावर सोन्याचे किंवा मौल्यवान दागिने घालुन निघू नये व बाहेर गावी जातांना घरात मौल्यवान दागिने किंवा कॅश ठेवु नये, आपले परिसरात कोणतेही संशयीत व्यक्ती किंवा वाहन दिसुन आल्यास तात्काळ पोलीस नियत्रंण कक्ष, डायल ११२ किंवा जवळचे पोलीस ठाणेला माहिती दयावी. व काही अडचनी असल्यास आम्हाला संपर्क करावा असे सांगुन मोवाईल नंबर देवून जनजागृती केली. तसेच पोलीसांनी जनतेला येणारे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले.
सदर जनजागृती कार्यक्रम पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) यांचे मार्गदर्शनात, पोनि. रमेश ताले, पोहवा, पुरूषोत्तम काळमेघ, नापोअं, आशिष क्षीरसागर व युनिट क. ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी केली.