नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने शुक्रवारी (ता.९) सुभाषनगर येथे स्वामी विवेकानंद स्मारकापुढील परिसरात पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने जनजागृती करण्यात आली. वीज बचतीसाठी सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन संस्थेच्या सदस्यांनी यावेळी नागरिकांना एक तासासाठी अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन केले.
जनजागृती उपक्रमा दरम्यान ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील व्यापारी बांधवाना, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले व नागरिकांना किमान १ तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. परिसरातील व्यापारी बांधवांनीही मनपा व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्युत दिवे बंद करून उपक्रमात आपले योगदान दर्शविले.
माजी आमदार प्रा. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात हे अभियान राबविण्यात येते. ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात टिम लिडर सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, शितल चौधरी, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रीया जोगे, तुषार देशमुख, रक्षित गोंदोडे या संपूर्ण चमूद्वारे जनजागृती कार्य करण्यात आले त्यांना मनपाचे गजेंद्र तारापुरे, सुनील नवघरे, सचिन फटे यांनी सहकार्य केले.