– पोलिसांकडून २५ कार्यकर्त्यांना अटक
नागपूर :- काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या आरक्षण संपवणाऱ्या विधानवरुन देशाचे वातावरण चांगलेच तापले असताना ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत यशवंत मनोहर यांनी राज्यघटना वाचवायची असेल तर इंडिया आघाडीला मतदान केले पाहिजे असे वक्तव्य केले. आरक्षणाबाबतच्या मनोहर यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या नागपूर शहर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी यशवंत मनोहर यांच्या घरासमोर नारे देत आंदोलन केले.
वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे सदस्य भीमपुत्र विनय भांगे यांच्या नेतृत्वात मंगळवारी आंदोलन करण्यात आले. काँग्रेसला साथ देण्यासाठी यशवंत मनोहर समाजाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप यावेळी भीमपुत्र विनय भांगे यांनी केला.
सदर आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती तरी वंचित बहुजन आघाडी कडून निषेध म्हणून यशवंत मनोहर यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतापनगर पोलिसांकडून २५ कार्यकर्त्यांना अटक केली.
आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश सदस्य भीमपुत्र विनय पुरुषोत्तम भांगे, बहुजन आघाडी दक्षिण पश्चिम विधानसभा अध्यक्ष संजय सूर्यवंशी, विनोद भांगे, राहुल दहीकर, शांता शेंडे, रवींद्र नंदेश्वर, शिशुपाल देशभ्रतार, हरिदास गवई, किशोर धोटे, दिलीप जारे, राहुल भिमटे, विजय गोंदुले, मयुर गाजघाटे, अनिल गाजघाटे, विशाल वहिले, प्रतीक गटलेवर, शिव विश्वकर्मा, विकास राऊत आणि दक्षिण पश्चिम मतदार संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.