संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मणिपूर येथील कुकी या आदिवासी जमातिच्या महिलेवर झालेंल्या अन्याय व अत्याचाराचा वंचित बहुजन आघाडी कामठी शहर तर्फे आज कामठी तहसील कार्यालय समोर जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
मणिपूर राज्यातील इन्फळ पासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील कुकी या आदिवासी जमातीच्या दोन महिलांना पोलिसांच्या संरक्षणातुन बाहेर काढून मैतेई पुरुषांच्या हिंस्त्र जमावाने विवस्त्र करून त्यांच्या नग्न देहाची विटंबना करण्यात आली .ही निर्दयी घटना पोलिसांच्या समक्ष घडूनही पोलिसांनी त्यावर कुठलीच कारवाही केली नाही व गुन्हा सुद्धा दाखल केला नाही .या अमानवीय कृत्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी कामठी शहर तर्फे शहराध्यक्ष दीपक वासनिक यांच्या नेतृत्वात आज सकाळी 11 वाजता कामठी तहसील कार्यालय समोर नारे निदर्शने करीत जाहीर निषेध करण्यात आला. व तहसीलदारला सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा महासचिव प्रशांत नगरकर,जिल्हा पदाधिकारी नरेश वाघमारे, सी सी वासे,माजी नगरसेवक दादा कांबळे, माजी नगरसेविका मोहलता मेश्राम,निकिता मेश्राम, राजेश ढोके, सुदेश श्यामकुवर, उमेश सुखदेवें,सुमित गेडाम,रवी वानखेडे,अल्पेश वालदे,अभिषेक नागोसे,निलेश पाटील,सचिन गायकवाड,सरोज गजभिये, विदेश डोंगरे,नयन जामगडे, सुरज वाघमारे ,अक्षय लोखंडे,रजत जामगडे, अजय मेश्राम आदी उपस्थित होते.