बसपा ने छत्रपती शिवाजींना अभिवादन केले 

नागपुर – स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंती निमित्त प्रदेश बसपाचे सचिव राजीव भांगे, प्रदेश सचिव उत्तम शेवडे, नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप मेश्राम, प्रभारीद्वय राहुल सोनटक्के, नरेश वासनीक, सचिव अभिलेश वाहाने, नागपूर शहराध्यक्ष शादाब खान, उपाध्यक्ष सुमंत गणवीर, प्रभारीद्वय विकास नारायणे, ओपुल तामगडगे, महासचिव सागर लोखंडे, महिलांच्या वतीने सुरेखा डोंगरे, वर्षा वाघमारे, माया उके, करुणा मेश्राम आदीं बसपा नेत्यांनी महाल स्थित शिवाजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी बसपा कार्यकर्त्यांनी जय शिवाजी जय भिम, जय शिवराया जय भिमराया, शिवाजी महाराज आपका स्वराज अधुरा बीएसपी करेगी पुरा, बहुजन महापुरुषोके सन्मान मे बीएसपी मैदान मे, संविधान के सन्मान में बीएसपी मैदान में, बहुजन प्रतिपालक शिवाजी महाराज जिंदाबाद आदि स्वयंस्फूर्त नारे लावले.

बसपा कार्यकर्त्यांच्या हातातील शिवरायांची प्रतिमा असलेले भगवे ध्वज व बसपाचे निळे ध्वज उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.

याप्रसंगी प्रामुख्याने माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, राजकुमार बोरकर, योगेश लांजेवार, माजी मनपा पक्ष नेते गौतम पाटील, जगदीश गजभिये प्रवीण पाटील, शंकर थुल, सदानंद जामगडे, नितीन वंजारी, बुद्धम राऊत, प्रकाश फुले, प्रा सुनील कोचे, सचिन मानवटकर, भानुदास ढोरे, संजय डहाट, वीरेंद्र कापसे, सुनील सोनटक्के, सुबोध साखरे, सुनील डोंगरे, विलास पाटील, मुकेश मेश्राम, मॅक्स बोधी, परेश जामगडे, शामराव तिरपुडे, बाल्या मेश्राम, अतुल खोंडे, प्रशांत पाईक, विशाल बनसोड, विकी वानखेडे, स्नेहल उके, राजेश बघेल, राजकुमार सोमकुवर, सुमित जांभुळकर, संबोधी डहाट, गौतम सरदार, विवेक सांगोळे, विनोद मेश्राम, ईश्वर कांबळे, अनिल मेश्राम, प्रफुल टिकले आदि प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com