दीनदयाल नगर च्या पडोळे चौकात विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर धरणा आंदोलन 15 ऑक्टोबर रोजी

नागपूर :- विदर्भ कोकण ग्रामीण बैंक मुख्य कार्यालय, चंद्रप्रस्थ 3 रा माळा, दिनदयाळ नगर, पडोळे चौक, नागपूर समोर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी / अधिकारी तसेच मृत कर्मचारी / अधिकारी यांचे वारसान त्यांचे विविध प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी येत्या 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या दरम्यान धरणा देणार आहेत.

प्रमुख मागण्या,

1) बँक व्यवस्थापनाने तत्कालीन वैनगंगा क्षेत्रीय ग्रामीण बँकेतील जवळपास 410 कर्मचारी / अधिकारी यांचे नागपूर भविष्य निर्वाह निधी कार्यालयात सुरळीतपणे सुरु असताना, (रत्नागिरी सिंधुदुर्ग ग्रामीण बँक, सोलापूर ग्रामीण बँक व वैनगंगा क्षेत्रीय ग्रामीण बैंक यांचे डिसेंबर 2008 मध्ये एकत्रीकरण झाल्यावर वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक झाली). त्यांचे सोलापूर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयात नव्याने खाते उघडून तिथे भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा करणे सुरु केले. मात्र नागपूर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील रक्कम सोलापूर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील संबधितांचे खात्यात जमा करण्याची कोणतीही तसदी घेतली नव्हती. हि बाब भारतीय मजदूर संघ प्रणीत वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक वर्कर्स /ऑफिसर्स ऑर्गनायझेशन यांचे निदर्शनास येताच संघटनेशी क्षेत्रीय श्रम आयुक्त नागपूर यांचे कार्यालयात सप्टेंबर 2011 मध्ये इंडस्ट्रीयल डिस्पूट एक्ट नुसार डिस्पूट लावल्यावर सदर खात्यातील रक्कम सोलापूर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील संबधितांचे खात्यात सन 2011-12 या आर्थिक वर्षात जमा करण्यात आली. मात्र नागपूर भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने 01 एप्रील 2011 ते रक्कम वळती केल्याचे तारखेपर्यंतचे अद्यावत व्याज दिले नव्हते. तसेच सोलापूर पी.एफ.ऑफिसने सुध्दा सदर वळती झालेल्या लाखों रुपयांचे रकमेवर सन 2011-12 या आर्थिक वर्षात काहीही व्याज दिले नाही. त्यामुळे कर्मचारी/अधिकारी यांचे अंशदानाचे रकमेवरील व्याजाचे हजारों रुपयांचे व बँक व्यवस्थापनाचे त्यांचे अंशदानाचे रकमेवरील व्याजाचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. ही बाब बैंक व्यवस्थापनाने सन 2014 मध्ये लक्षात आणून देऊनही तत्कालीन बँक व्यवस्थापनाने काहीही केले नाही. आजघडीला ही रक्कम प्रती कर्मचारी/अधिकारी जवळपास 50 ते 60 हजार व बँकेचे जवळपास 1 कोटी 30 लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे. काही मोजक्या 5-6 कर्मचाऱ्यांनी पी.जी.पोर्टलवर तक्रार केल्याने व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला माहीतीचे अधिकारात माहीती मागीतल्याने भविष्य निर्वाह निधी कार्यालय सोलापूर ने त्यांना सन 2011-12 या आर्थिक वर्षात न दिलेल्या व्याजाची व सदर व्याज रकमेवर अद्यावत व्याज देऊन नुकतीच परत केली आहे. यात बँकेला सुध्दा हजारो रुपये मिळाले आहेत. याकरिता बँक व्यवस्थापनाने शर्थीचे प्रयत्न करावेत.

2) काही कर्मचारी / अधिकारी सेवानिवृत्त होऊन २ वर्ष कालावधी लोटूनही त्यांना अद्याप भविष्य निर्वाह निधीची रक्कम प्राप्त झाली नाही. यातील काही मृत देखील पावलेत. त्यांनी किंवा त्यांचे वारसदारांनी बँकेला रितसर अर्ज सादर करुनही भविष्य निर्वाह निधीची रक्कम अजूनही मिळाली नाही. त्यामुळे हयातितील सदर कर्मचारी / अधिकारी / मृत कर्मचारी अधिकारी यांचे वारसदार सुद्धा धरणा देणार आहेत.

3) बैंक सेवेत कर्तव्यावर असताना जे कर्मचारी / अधिकारी कोरोना काळात मृत पावलेत त्यापैकी काहींचे वारसदारांना तोंड पाहून वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली मात्र स्वर्गिय राजू देवराव राऊत यांचे वारसदारांना सन 2022 पासून ताटकळत ठेवले असून कुटुंबासमवेत धरणा देणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकार दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अखेर अंगुलीमाल गेला बुद्धाच्या चरणी

Sat Oct 12 , 2024
– दीक्षाभूमीवर बुद्ध, आम्रपाली लघुनाट्य – ‘बुद्धं गच्छामि’च्या स्वरात दीक्षाभूमी निनादली नागपूर :- जंगलात राहणारा अंगुलीमाल भीती दाखवून लोकांची बोटे कापायचा. बोटांची माळ तयार करून गळ्यात घालायचा. त्याची दहशत पाहून स्वत तथागत गौतम बुध्द त्यांच्याशी भेटायला जातात. धारदार शस्त्रासह तथागतांना मारण्यासाठी आलेला अंगुलीमाल कसा शांत होत बुद्धाला शरण जातो, नंतर तो बनतो आणि शेवटपर्यंत बुद्घाच्या संघात राहातो, असा हुबेहुब प्रसंग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com