– अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मानले आयुक्तांचे आभार
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त पदोन्नतीची पदे भरण्यात आली असुन आश्वासीत प्रगती योजनेमधील कर्मचा-यांच्या मागण्यांची पुर्तता केल्याने मनपातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आयुक्त व प्रशासक विपीन पालीवाल यांचे आभार मानले आहेत.
मागील बरेच वर्षांपासुन चंद्रपूर मनपाच्या आस्थापनेवरील गट – अ ते गट – ड संवर्गातील विविध पदे रिक्त होती त्यामुळे मनपा प्रशासकीय कामावर विपरीत परिणाम होत होता. याबाबत अधिकारी व कर्मचारी यांचेकडून वेळोवेळी पदोन्नतीची रिक्त असलेली पदे भरण्याबाबत मागणी करण्यात येत होती. त्यानुसार शासनाकडून आकृतीबंध आणि सेवा शर्ती नियम मंजूर झाल्यानंतर कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचेमधून पदभरती करण्याचे आदेश आयुक्त यांनी दिले होते.
त्यानुसार पदोन्नती देण्यास समिती गठीत करण्यात येऊन पात्र कर्मचा-यांना पदोन्नतीचे आदेश निर्गमीत करण्यात आले, बऱ्याच कालावधीनंतर पदोन्नती व आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ दिल्यामुळे मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्यातर्फे आनंद व्यक्त करण्यात येत असुन आयुक्त विपिन पालीवाल,अति. आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, मुख्य लेखापरिक्षक मनोज गोस्वामी, शहर अभियंता अनिल घुमडे, डॉ. अमोल शेळके, अनिल बाकरवाले यांचे सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांतर्फे आभार व्यक्त करण्यात येत आहे.