ड्रोन प्रक्षेपण व ड्रोनचा वापर करण्यास बंदी

यवतमाळ :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यवतमाळ शहरानजीक भारी येथील मैदानात दि.28 फेब्रुवारी रोजी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्याच्या हद्दीत ड्रोन प्रक्षेपण व ड्रोन वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री हेलिकॅाप्टरने येणार असून नागपूर-तुळजापुर महामार्गाने कार्यक्रमस्थळी जाणार आहे. त्यामुळे प्रधानमंत्री महोदयांची व कार्यक्रमाच्या सुरक्षेच्यादृष्टीने जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्ह्याच्या हद्दीत ड्रोन प्रक्षेपण व ड्रोन वापरावर बंदी घातली आहे.

सदर बंदी दिनांक 24 फेब्रुवारीपासून दि.28 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजतापर्यंत राहणार आहे. बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 कारवाई केली जातील, असे बंदी आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोथरुड येथे दिव्यांग मतदार जन जागृती यात्रा संपन्न

Tue Feb 27 , 2024
पुणे :- कोथरूड विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते अंध मुलींच्या शाळेदरम्यान दिव्यांग मतदार जनजागृती यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी दि पूना ब्लाइंड स्कूलच्या विद्यार्थिनींनी पथनाट्याद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी अधिकाधिक मतदानाद्वारे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध घटकांसाठी मतदार जागृती अभियान राबविले जात असून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com